पुणे – जिल्ह्यातील महाविद्यालये चालू करण्याचा निर्णय होऊनही त्याविषयी शासनाचा आदेश नसल्याने अडथळा निर्माण झाला आहे. त्यामुळे महाविद्यालये चालू होणार कि नाही ? असा संभ्रम निर्माण झाला आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ आणि उच्च शिक्षण संचालनालयाला शासनाकडून अद्याप आदेश मिळाला नसल्याने महाविद्यालये प्रत्यक्ष पद्धतीने चालू होणार कि नाही असा संभ्रम आहे. प्रत्यक्ष वर्ग घेण्यासाठी सर्व सुविधा निर्माण करणे आणि वर्गखोल्यांचे निर्जंतुकीकरण करणे आवश्यक असल्याने किमान आठवडाभर तरी नियोजनासाठी लागेल, असे प्राचार्यांचे म्हणणे आहे.