पंचनामे होत रहातील, आधी शेतकर्‍यांना साहाय्य करा ! – देवेंद्र फडणवीस, विरोधी पक्षनेते

‘राज्यात आतापर्यंत ज्या ज्या आपत्ती आल्या, त्या वेळी सरकारने केलेल्या सर्व घोषणा हवेत विरल्या आहेत. कोणत्याच घोषणेची अद्याप पूर्तता झालेली नाही.’, असे फडणवीस यांनी सांगितले.

समन्स बजावताच नेते न्यायालयात जात असल्याने चौकशी कशी करायची ? – अंमलबजावणी संचालनालय

विविध भ्रष्टाचार प्रकरणांमध्ये चौकशी करण्यासाठी समन्स बजावताच नेते न्यायालयाची पायरी चढत आहेत, मग चौकशी कशी करायची ? असा प्रश्न अंमलबजावणी संचालनालयाच्या (‘ईडी’च्या) अधिवक्त्यांनी शिवसेना खासदार आनंदराव अडसूळ यांच्या याचिकेवरील सुनावणीप्रसंगी उच्च न्यायालयात उपस्थित केला.

बालकांच्या लसीकरणाविषयी केंद्राने लवकरात लवकर निर्देश द्यावेत ! – अजित पवार, उपमुख्यमंत्री

राज्यातील शाळा ४ ऑक्टोबरपासून चालू करण्याचा निर्णय झाला आहे; मात्र पालकांची आपल्या मुलांना शाळेत पाठवण्याची मानसिकता दिसत नाही.

श्री तुळजाभवानी मंदिरात नवरात्रोत्सव काळात प्रतिदिन १५ सहस्र भाविकांनाच प्रवेश !

शारदीय नवरात्रोत्सव काळात प्रतिदिन पहाटे ४ ते रात्री १० या वेळेत केवळ १५ सहस्र भाविकांनाच प्रवेश दिला जाणार आहे

जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण आढळण्याच्या प्रमाणात घट

जिल्ह्यात गेल्या २४ घंट्यांत कोरोनाचे ३६ नवीन रुग्ण आढळले. गेल्या काही दिवसांच्या तुलनेत हे प्रमाण अल्प आहे. कोरोनामुळे दोघांचा मृत्यू झाला. कोरोनामुळे मृत्यू झालेल्या रुग्णांची एकूण संख्या १ सहस्र ४०८ झाली आहे.

महिला प्रवाशांना समाजकंटकांचा त्रास होऊ नये, यासाठी रात्री ‘एस्.टी’चे दिवे चालूच ठेवणार ! – राज्य परिवहन महामंडळाचा निर्णय

असे वरवरचे उपाय काढण्यापेक्षा समाजकंटकांचे त्रास देण्याचे धारिष्ट्य होणार नाही, अशा पद्धतीने त्यांच्यावर कठोर कारवाई केली पाहिजे, अशी प्रवाशांची अपेक्षा आहे !

नाशिक येथे नवरात्रोत्सवात वणीचे सप्तश्रृंगी मंदिर २४ घंटे चालू रहाणार !

‘जिल्ह्यात नवरात्रोत्सवाची सिद्धता मोठ्या उत्साहात चालू झाली आहे. या काळात वणी येथील सप्तश्रृंगी मंदिरही खुले रहाणार आहे; मात्र भाविकांना पासविना मंदिरात प्रवेश दिला जाणार नाही. ६५ वर्षांवरील आणि आजारी व्यक्ती, गर्भवती महिला अन् लहान मुले यांनी या काळात गडावर येऊ नये’

तुळजापूर आणि कोल्हापूर येथील देवींच्या मंदिरांमध्ये शारदीय नवरात्र महोत्सवाची पूर्वसिद्धता चालू !

राज्यशासनाने मंदिर उघडण्याचा निर्देश दिल्यामुळे तुळजापूर येथे श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानच्या वतीने आयोजित करण्यात येणार्‍या शारदीय नवरात्र महोत्सवाची पूर्वसिद्धता चालू करण्यात आली आहे.

परमबीर सिंह देशाबाहेर गेल्याविषयीची निश्चित माहिती नाही ! – दिलीप वळसे पाटील, गृहमंत्री

ते पुढे म्हणाले, ‘‘परमबीर सिंह यांना आम्ही शोधत आहोत. आम्ही जाणूनबुजून कुणाच्याही मागे लागून कारवाई करत नाही. जे नियमाला धरून असेल, तेच होईल. आमचे अधिकारी केंद्रशासनाशी समन्वय साधून आहेत.’’