जेजुरी देवस्थानाची ११३ एकर भूमी त्यांना मिळणार !

सरकारीकरण झालेली मंदिरे आणि पवित्र स्थाने यांची स्थिती काय होऊ शकते ?, हे या उदाहरणातून लक्षात येते. यामुळे सरकारीकरण रहित करून मंदिरे भक्तांच्या कह्यात देण्यासाठी हिंदु राष्ट्राची स्थापना करा !

परिवहनमंत्री अनिल परब भाजपचे सोमय्या यांच्या विरोधात १०० कोटींचा अब्रुहानीचा दावा करणार !

सोमय्या यांनी परब यांच्यावर दापोली येथे बेकायदा उपाहारगृह बांधणे, परिवहन विभागात स्थानांतराचे ‘रॅकेट’ चालवणे असे गंभीर आरोप केले होते.

आतंकवादी जान महंमद शेख याचे २० वर्षांपासून दाऊदशी संबंध होते, तसेच आमचे त्याच्यावर लक्ष होते ! – विनीत अग्रवाल, अतिरिक्त महासंचालक, आतंकवादविरोधी पथक

पोलीस अधिकार्‍यांनी नुसती अशी माहिती देऊन काय उपयोग ? एवढी वर्षे एक आतंकवादी दाऊदशी संबंध ठेऊन मुंबईत रहात आहे, तर तेव्हाच कारवाई का केली नाही ? ‘आमचे त्याच्यावर लक्ष होते’ या म्हणण्याला काय अर्थ आहे ?

राजकीय लढायांसाठी न्यायालयाचा वापर करता कामा नये !

परिवहनमंत्री अनिल परब यांच्या विरोधातील याचिकेवर उच्च न्यायालयाने सुनावले.

पुणे येथे कोरोनाच्या संसर्गाचे कारण पुढे करत प्रशासनाकडून श्री गणेशमूर्ती विसर्जनास बंदी; मात्र संकलन केंद्रावर तुडुंब गर्दी !

कोरोनाच्या संसर्गाचे कारण पुढे करत वहात्या पाण्यात विसर्जनास बंदी घालणार्‍या प्रशासनाला संकलन केंद्रांवरील गर्दी दिसत नाही का ?

राज्य सरकारने डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापिठाकडे दिले दायित्व !

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ९ सप्टेंबर या दिवशी संभाजीनगर जिल्ह्यातील विविध विकास कामांचा आढावा घेतला होता, तेव्हा त्यांनी पैठण येथील संतपिठाचे शैक्षणिक व्यवस्थापन डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापिठाकडे सोपवण्याची सूचना केली होती. 

महिलांविषयी राज्य सरकार पूर्णपणे असंवेदनशील ! – राष्ट्रीय महिला आयोग

साकीनाका येथील बलात्कार प्रकरणानंतर त्यांनी पथकासह पीडितेच्या कुटुंबियांची भेट घेतली.

श्री गणेशमूर्तींचे कृत्रिम हौदांमध्ये विसर्जन न करण्याविषयी आणि कागदी लगद्यापासून मूर्ती बनवणार्‍यांवर कारवाई करावी, यांसाठी यवतमाळ येथे हिंदु जनजागृती समितीचे निवेदन सादर !

‘अशाप्रकारे श्री गणेशमूर्तींची विटंबना होणार नाही’, असे आश्वासन मुख्याधिकारी यांनी या वेळी दिले.

साकीनाका बलात्कार प्रकरण खटल्यातील अधिवक्ता पालटण्याची पीडितेच्या आईची मागणी !

राजा ठाकरे यांच्या हलगर्जीपणामुळे तडवी यांच्या गुन्ह्यातील आरोपी आधुनिक वैद्यांना जामीन मिळाला होता, असा आरोप पीडितेच्या आईने केला आहे. 

महाराष्ट्रात ८ मासांत लाचखोरीचे ५३२ गुन्हे !

इंदिरा गांधींनी भ्रष्टाचाराला शिष्टाचार करण्याची कुप्रथा पाडली, त्याचा आज वृक्ष झाला आहे. ‘अधिकार्‍यांना राजकीय नेत्यांकडे पैसे पोचवावे लागतात’, असे अधिकारी सांगतात. भ्रष्टाचार समूळ नष्ट करण्यासाठी नैतिक शासनकर्त्यांची आवश्यकता आहे.