मुंबई – महिलांविषयी राज्य सरकार पूर्णपणे असंवेदनशील आहे, अशी टीका राष्ट्रीय महिला आयोगाच्या सदस्या चंद्रमुखीदेवी यांनी केली. साकीनाका येथील बलात्कार प्रकरणानंतर त्यांनी पथकासह पीडितेच्या कुटुंबियांची भेट घेतली. तसेच साकीनाका पोलीस ठाणे आणि राजावाडी रुग्णालयात जाऊन संबंधित घटनेची माहिती घेतली. त्यानंतर त्या प्रसारमाध्यमांशी बोलत होत्या.
या प्रकरणात पोलीस आयुक्तांनी ‘आम्ही सगळीकडे लक्ष देऊ शकत नाही’, असे विधान केले. ते अत्यंत निंदनीय आहे. पोलीस सगळीकडे लक्ष ठेवू शकत नाही, हे आम्हालाही कळते; परंतु पोलिसांचा एक धाक असतो, त्यामुळे गुन्हेगारांवर वचक निर्माण होतो, तो निर्माण करायला हवा. ते न करता त्यांनी अशी विधान करणे चुकीचे आहे, असे चंद्रमुखीदेवी यांनी म्हटले आहे.