शाळकरी मुलाचे लैंगिक शोषण करणार्‍या २७ वर्षीय महिलेला २० वर्षांच्या कारावासाची शिक्षा !

  • अशी विकृती निर्माण होण्यामागे आतापर्यंतच्या सर्वपक्षीय शासनकर्त्यांनी जनतेला नैतिकता न शिकवणे, हेच कारण आहे ! – संपादक
  • पुरुषांच्या बरोबरीने आता महिला लैंगिक अत्याचारही करण्यात अग्रेसर आहेत, असे यातून म्हणयाचे का ? – संपादक
(प्रतिकात्मक छायाचित्र)

भाग्यनगर (तेलंगाणा) – येथे ज्योती मंजुळा नावाच्या २७ वर्षीय महिलेला लहान मुलाचे लैंगिक शोषण केल्याच्या प्रकरणी २० वर्षांचा कारावास आणि २० सहस्र रुपये दंड, अशी शिक्षा सुनावण्यात आली आहे. ज्योतीवर पॉक्सो कायद्याच्या अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला होता. ज्या शाळेमध्ये हा मुलगा शिकत होता तिथे ज्योती मुलांची काळजी घेणारी महिला शिपाई म्हणून काम करायची. मुलाच्या शरिरावर चटक्यांचे व्रण दिसून आल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. या महिलेने मुलाला सिगारेटचे चटकेही दिले होते.