गोवा शासनाने आधी जारी केलेली गणेशोत्सवाशी संबंधित मार्गदर्शक नियमावली आक्षेपार्ह सूत्रांमुळे केली स्थगित !

महसूल खात्याचे सचिव संजय कुमार यांनी जारी केलेली नियमावली स्थगित केल्याची माहिती संबंधित सर्व अधिकार्‍यांना दिली आहे, तसेच लवकरच नव्याने नियमावली प्रसिद्ध करणार असल्याचे म्हटले आहे.

नांदेड जिल्ह्यात अतीमुसळधार पावसामुळे अनेक गावांचा संपर्क तुटला, विष्णूपुरी धरणाचे ९ दरवाजे उघडले !

१५ दिवसांनंतर काढणीला येणार्‍या सोयाबीनचे पीक पाण्याखाली गेल्यामुळे शेतकर्‍यांची प्रचंड हानी झाली आहे.

कुडाळ शहरात सापडल्या सव्वा ५ लाख रुपयांच्या बनावट नोटा

शहरातील मारुति मंदिराजवळ असलेल्या भाजीबाजारात ७ सप्टेंबरला सकाळी सापडलेल्या २ पिशव्यांमध्ये ५ लाख २५ सहस्र रुपयांच्या बनावट नोटा आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. कुडाळ पोलीस निरीक्षक फुलचंद मेगडे यांनी घटनास्थळी जाऊन पहाणी केली

आजपासून मुंबई-गोवा महामार्गावर अवजड वाहनांना वाहतुकीस बंदी

८ ते १० सप्टेंबर, १४ सप्टेंबरला सकाळी ८ ते १५ सप्टेंबरला रात्री ८ वाजेपर्यंत, तसेच १९ सप्टेंबरला सकाळी ८ ते २० सप्टेंबरला रात्री ८ या कालावधीत १६ टन किंवा त्याहून अधिक क्षमतेच्या वाहनांना ही बंदी असणार आहे.

सिंहगडावर भव्य विश्रामगृह आणि शिवसृष्टी साकारण्याचा जिल्हा परिषदेचा प्रस्ताव !

जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी आयुष प्रसाद यांनी सांगितले की, पुनर्विकास झाल्यास सिंहगड किल्ल्यावर संस्कृतीचे दर्शन घडेल, तसेच शिवशाही काळातील वास्तूरचना, ऐतिहासिक वारसा जतन करण्याचा हा एक प्रयत्न आहे.

पणजी महानगरपालिकेच्या वतीने श्री गणेशचतुर्थीसाठी मार्गदर्शक तत्त्वे प्रसिद्ध

प्लास्टर ऑफ पॅरिसच्या श्री गणेशमूर्तींची विक्री किंवा खरेदी करण्यास सक्त बंदी

अतीवृष्टी आणि चक्रीवादळ यांमुळे जामनेर (जळगाव) तालुक्यातील १७ गावे बाधित !

यामुळे घरे आणि शेती यांची प्रचंड हानी झाली आहे. संसारोपयोगी साहित्याचीही हानी झाली.

परमबीर सिंह यांच्या विरोधात जामीनपात्र ‘लूकआऊट’ नोटीस

पुन्हा नोटीस काढूनही उपस्थित न राहिल्यामुळे आयोगाने परमबीर सिंह यांना ५० सहस्र रुपयांचा दंड आकारला आहे.

विशाळगडाच्या अतिक्रमणमुक्तीसाठी शासनस्तरावर पाठपुरावा करण्यासाठी म्हारूळ आणि साबळेवाडी (जिल्हा कोल्हापूर) येथील ग्रामपंचायतींचे ठराव !

म्हारूळ येथील ठराव करण्यासाठी धर्मप्रेमी श्री. अजित पाटील यांनी पुढाकार घेतला, तर साबळेवाडी येथील धर्मप्रेमी श्री. शुभम् वरपे यांनी पुढाकार घेतला. या दोघांना धर्मप्रेमी श्री. राहुल पाटील यांनी विषय सांगितला.