चांदा (नगर) येथील अनधिकृत पशूवधगृहावर कारवाई !

६ लाखांचा मुद्देमाल जप्त, १० जनावरांची सुटका

अनेकदा कारवाई होऊनही या भागात अवैध पशूवधगृहे चालूच आहेत. निष्क्रीय आणि भ्रष्ट पोलीस प्रशासनामुळेच धर्मांधांना कायद्याचा धाक राहिलेला नाही ! आरोपींना कठोर शासन होत नसल्यामुळेच अवैध पशूवधगृहे बंद पडत नाहीत ! – संपादक

प्रतिकात्मक छायाचित्र

नेवासे (नगर), ७ सप्टेंबर – चांदा येथील अनधिकृत पशूवधगृहावर सोनई पोलीस ठाण्याच्या पोलिसांनी धाड टाकत टेम्पोसहित ६ लाखांचा मुद्देमाल जप्त करून १० जनावरांची सुटका केली आहे. जनावरांना तातडीने सुरक्षा, देखभाल, संवर्धन आणि पालनपोषण यांसाठी मढी भागातील वृद्धेश्वर येथील ‘जय गोमाता सेवाभावी संस्थे’त पाठवण्यात आले आहे. पसार झालेला जनावरांचा मालक अताऊला पठाण आणि टेम्पोवरील अज्ञात चालक यांच्याविरुद्ध सोनई पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा नोंद करण्यात आला आहे. (जनावरांचा धर्मांध मालक आणि वाहनचालक पसार कसा होतो ? कि त्यांना पळून दिले जाते ? – संपादक)