बनावट देयकांद्वारे ‘जी.एस्.टी.’ परतावा मिळवणार्‍या उद्योगसमुहाच्या गोदामांवर धाडी !

या धाडीमध्ये ३ कोटी रुपयांच्या रोख रकमेसह ५ कोटी २० लाख रुपयांचे दागिने आणि १ कोटी ३४ लाख रुपयांची चांदी प्राप्तीकर विभागाने कह्यात घेतली आहे.

सध्याचा काळ साधनेसाठी अनुकूल असल्याने साधनेचे प्रयत्न वाढवा ! – सद्गुरु (कु.) स्वाती खाडये, धर्मप्रचारक, सनातन संस्था

हिंदु राष्ट्र स्थापनेसाठी विविध उपक्रमांच्या माध्यमातून अधिकाधिक हिंदूंना जागृत करण्यासाठी प्रयत्न करायला हवेत. हे करतांना आपल्यातील दोष आणि अहं यांवर मात करण्याचा प्रयत्न केला पाहिजे, असे मार्गदर्शन सद्गुरु (कु.) स्वाती खाडये यांनी केले.

मंदिरे चालू करण्यासाठी भाजपच्या वतीने राज्यभरात शंखनाद आंदोलन !

‘राज्यातील मंदिरे उघडावीत’, या मागणीसाठी भाजपच्या वतीने ३० ऑगस्ट या दिवशी श्रीकृष्णजयंती आणि चौथ्या श्रावणी सोमवारच्या पवित्र मुहूर्तावर राज्यात ठिकठिकाणी ‘शंखनाद आंदोलन’ करण्यात आले.

ठाणे येथे दहीहंडी उत्सव साजरा करण्यावर मनसेने आंदोलन केल्याप्रकरणी १७ जणांना अटक !

दहीहंडी उत्सव साजरा करण्याच्या अनुषंगाने नौपाडा येथील भगवती मैदानावर मनसेने अनुमती नसतांनाही व्यासपीठ बांधण्यास प्रारंभ केला.

शिवसेना खासदार भावना गवळी यांच्या शिक्षण संस्थांवर अंमलबजावणी संचालनालयाकडून धाडी !

भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी खासदार भावना गवळी यांच्या शिक्षण संस्थांमध्ये १०० कोटी रुपयांचा आर्थिक घोटाळा झाल्याचा आरोप केला होता.

कोरोनामुळे राज्यात दोन्ही पालक गमावणार्‍या ५७० बालकांना ‘मिशन वात्सल्य’चा लाभ मिळणार ! – यशोमती ठाकूर, महिला आणि बालकल्याणमंत्री

या मिशनच्या कार्यवाहीसाठी राज्यातील सर्व तालुक्यांत ‘तालुका समन्वय समिती’ गठीत करण्यात आली आहे.

महाराष्ट्रात ‘मराठी भाषा विद्यापिठा’साठी समिती नियुक्त करण्यात येणार !

८-१० दिवसांत समितीची प्रक्रिया पूर्ण केली जाणार असून समितीच्या अहवालानंतर विद्यापीठ निर्मितीच्या संदर्भात निर्णय घेण्यात येईल…

वाझे यांची पोलीस कोठडी न्यायालयाने नाकारली !

उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर स्फोटके आढळल्याप्रकरणी, तसेच मनसुख हिरेन यांच्या हत्या प्रकरणात अटक करण्यात आलेले सचिन वाझे यांना राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेकडून पोलीस कोठडीची मागणी करण्यात आली होती.

पाकिस्तानी आणि ‘अफगाणी’ तालिबान !

पाक तालिबानला साहाय्य करत असल्याने तालिबान कधीही तहरीक-ए-तालिबानला पाकमध्ये कोणत्याही कारवाया करण्यास साहाय्य करणार नाही, मात्र पाकच्या विविध प्रांतांमध्ये संघर्ष चालूच आहे आणि तो निस्तरता आला नाही तर पाक ‘अफगाणी’ तालिबानचे साहाय्य घेईल आणि तालिबान अणूबाँबवर नियंत्रण मिळवेल,

अमरावती येथे लाच घेणार्‍या महिला सरपंचासह पती आणि भाचा अटकेत ! 

दीड सहस्र रुपये लाच घेतल्याप्रकरणी जळका पटाचे ग्रामपंचायतीच्या महिला सरपंच सौ. सोनाली संजय पिलारे यांच्यासह त्यांचे पती संजय पिल्लारे आणि भाचा विजय पिल्लारे यांना येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली आहे.