वाझे यांची पोलीस कोठडी न्यायालयाने नाकारली !

सचिन वाझे

मुंबई – उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर स्फोटके आढळल्याप्रकरणी, तसेच मनसुख हिरेन यांच्या हत्या प्रकरणात अटक करण्यात आलेले सचिन वाझे यांना राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेकडून पोलीस कोठडीची मागणी करण्यात आली होती. ३० ऑगस्ट या दिवशी मुंबई सत्र न्यायालयातील विशेष ‘एन्आय्ए’ न्यायालयाचे न्यायाधीश प्रशांत सित्रे यांनी ही मागणी फेटाळून लावली. या सुनावणीमध्ये सचिन वाझे यांनी दिलेला प्रकृती अस्वास्थ्याचा दाखला न्यायालयाने स्वीकारला असून त्यांना वैद्यकीय उपचारांसाठी खासगी रुग्णालयात भरती करण्याचे निर्देश दिले आहेत. हृदयविकाराचा त्रास होत असल्याविषयी वाझे यांनी न्यायालयात अर्ज केला होता. यामध्ये वाझे यांनी ‘फादर स्टॅन स्वामी यांच्याप्रमाणे माझा कारागृहातच मृत्यू होऊ नये, अशी इच्छा आहे. मला तातडीने योग्य वैद्यकीय उपचारांची आवश्यता आहे’, असे म्हटले होते.