शिवसेना खासदार भावना गवळी यांच्या शिक्षण संस्थांवर अंमलबजावणी संचालनालयाकडून धाडी !

भावना गवळी

मुंबई – शिवसेनेच्या वाशिम येथील खासदार भावना गवळी यांच्या ५ शिक्षण संस्थांवर ३० ऑगस्ट या दिवशी अंमलबजावणी संचालनालयाकडून धाडी टाकण्यात आल्या आहेत. भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी खासदार भावना गवळी यांच्या शिक्षण संस्थांमध्ये १०० कोटी रुपयांचा आर्थिक घोटाळा झाल्याचा आरोप केला होता. धाडी टाकण्यात आलेल्या शिक्षण संस्थांमध्ये वाशिम आणि यवतमाळ येथील संस्थांचा समावेश आहे. वाशिम जिल्ह्यातील रिसोड येथील उत्कर्ष प्रतिष्ठान, बालाजी सहकारी पार्टीकल बोर्ड, बीएम्एस् कॉलेज, भावना ॲग्रो प्रोडक्ट सर्व्हिस लिमिटेड या आस्थापनांवर अंमलबजावणी संचालनालयाने धाडी टाकल्या. वर्ष २०१९ मध्ये सलग चौथ्या वेळा त्या लोकसभेत निवडून आल्या आहेत.