अमरावती येथे लाच घेणार्‍या महिला सरपंचासह पती आणि भाचा अटकेत ! 

अमरावती – जिल्ह्यातील धामणगाव रेल्वे तालुक्यातील जळका पटाचे गावात तार कंपाऊंडचे काम करणार्‍या कामगारांच्या मजुरीच्या धनादेशावर स्वाक्षरी करण्यासाठी दीड सहस्र रुपये लाच घेतल्याप्रकरणी जळका पटाचे ग्रामपंचायतीच्या महिला सरपंच सौ. सोनाली संजय पिलारे यांच्यासह त्यांचे पती संजय पिल्लारे आणि भाचा विजय पिल्लारे यांना येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली आहे. (भ्रष्टाचाराने पोखरलेले लोकप्रतिनिधी ! – संपादक) तक्रारदार कामगारांनी गावातील तार कंपाऊंड आणि नाली यांचे बांधकाम मार्च २०२१ मध्ये पूर्ण केले होते. या कामाच्या मजुरीचा २२ सहस्र ७०० रुपयांचा धनादेश सेंट्रल बँकेत तक्रारदाराच्या नावे संमत झाला होता.