सनातनच्या कुडाळ येथील साधिका श्रीमती नलंदा खाडये यांचे निधन

श्रीमती नलंदा खाडये यांचे पूर्ण कुटुंबच सनातनच्या माध्यमातून साधनारत आहे. श्रीमती खाडये या गेली २४ वर्षे साधना करत होत्या. दिवसभरातील ६ ते ८ घंटे व्यष्टी साधना, दैनिक वाचन, प्रतिदिन अग्निहोत्र करणे हा त्यांचा नियमितचा दिनक्रम असे.

पेट्रोल-डिझेल दरवाढीच्या विरोधात आज राज्यात १ सहस्र ठिकाणी आंदोलन करणार ! – नाना पटोले, महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष, काँग्रेस

मोदी सरकारने पेट्रोल-डिझेल यांमधून कररूपाने कोट्यवधी रुपयांचा आर्थिक लाभ मिळवून सामान्य जनतेला महागाईच्या खाईत लोटले आहे.

कल्याण येथे बनावट निवडणूक ओळखपत्रांचा साठा हस्तगत !

कामेश मोरे याच्या विरोधात बनावट मतदार ओळखपत्रे सिद्ध केली म्हणून खडकपाडा पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा नोंद केला आहे.

नागूपर जिल्ह्यात ‘म्युकरमायकोसिस’चे ८४ टक्के रुग्ण !

पूर्व विदर्भातील नागपूर, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया आणि वर्धा या ६ जिल्ह्यांमध्ये ‘म्युकरमायकोसिस’चे १ सहस्र ४४१ रुग्ण आढळले आहेत.

गडचिरोलीतील ‘मद्यबंदी’विषयीचा निर्माण झालेला गोंधळ आणि संशय मुख्यमंत्र्यांनी दूर करावा !

गडचिरोली जिल्ह्यातच नव्हे, तर राज्यात सर्वत्र मद्यामुळे अनेकांचे संसार उद्ध्वस्त होऊन नागरिकांचे आरोग्य बिघडते, या सत्याचा सरकारने विचार करून उचित निर्णय घ्यावा !

माणगंगा नदीपात्रातील ८०० वर्षांपूर्वीच्या स्नानकुंडाकडे प्रशासनाचे दुर्लक्ष !

स्नानकुंडातील पवित्र तीर्थाचे आध्यात्मिक स्तरावर अनेक लाभ आहेत. तीर्थाचा भाविकांना लाभ होण्यासाठी प्रशासनाने कुंडाचा जीर्णोद्धार लवकर करावा, ही अपेक्षा ! संघटनांनी जीर्णोद्धार होईपर्यंत पाठपुरावा करावा !

फेसबूकचा वैचारिक आतंकवाद !

भारतीय संस्कृती आणि भारतीय नागरिकांची गोपनीयता यांपेक्षा फेसबूक मोठे नाही. आवश्यकता भासल्यास कठोर शिक्षा करून त्यांना वठणीवर आणावे, ही भारतियांची केंद्र सरकारकडून अपेक्षा !

भाजप नगरसेवकावर महिला तलाठीला मारहाण केल्याचा आरोप !

नंदुरबार ‘येथील भाजप नगरसेवक गौरव चौधरी यांनी वाळूचे ट्रक अडवल्याने महिला तलाठी निशा पावरा यांना शिवीगाळ करत मारहाण केली आहे’, असा आरोप पावरा यांनी चौधरी यांच्यावर केला आहे.

रायपाटण (रत्नागिरी) येथील आरोग्ययंत्रणेच्या कर्मचार्‍यांनी वृद्ध रुग्णांना उपचारानंतर सोडले अर्ध्या रस्त्यात

कोरोना रुग्णांची परवड करणार्‍या कर्मचार्‍यांवर कारवाई करा !

वाशिम येथे महिला पोलिसावर बलात्कार केल्याप्रकरणी पोलीस निरीक्षकावर गुन्हा नोंद !

असे पोलीस अधिकारी पोलीस विभागाला कलंकच असल्याने सरकारने त्यांना बडतर्फ करून कायद्यानुसार कठोर शिक्षा केली पाहिजे !