जनतेचे रक्षण करणार्या पोलिसांनी महिला पोलिसावर बलात्कार करणे यांसारखी लज्जास्पद गोष्ट कोणती ? असे पोलीस अधिकारी पोलीस विभागाला कलंकच असल्याने सरकारने त्यांना बडतर्फ करून कायद्यानुसार कठोर शिक्षा केली पाहिजे !

वाशिम – नांदेड जिह्यातील अर्धापूर पोलीस ठाण्यातील पोलीस निरीक्षक विश्वकांत गुट्टे यांनी वाशिम येथे ३० मे या दिवशी महिला पोलीस हवालदारावर बलात्कार केल्याप्रकरणी त्यांच्यावर पोलिसांनी भारतीय दंड विधान संहिता कलम ३७६ अन्वये गुन्हा नोंद केला आहे. या प्रकरणी महिला पोलीस हवालदार यांनी येथील पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती.
‘आरोपी गुट्टे हे वर्ष २००७ मध्ये मालेगाव पोलीस ठाण्यात पोलीस उपनिरीक्षक पदावर कार्यरत होते. त्यांच्याशी ओळख झाल्यावर त्याचा अपलाभ घेत ३० मे या दिवशी आरोपीने येथील माझ्या घरी येऊन बळजोरी करून बलात्कार केला’, असे पीडित महिला पोलीस हवालदार यांनी तक्रारीत म्हटले आहे. या प्रकरणाचे पुढील अन्वेषण पोलीस करत आहेत.
अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याच्या प्रकरणी तरुणाला पोलीस कोठडी
दोडामार्गमध्ये गायरान भूमीवर काळ्या दगडाच्या खाणीला ग्रामस्थांचा विरोध !
सरकारने देयके संमत न केल्याने प्राणी कल्याण संस्थेकडून भटक्या कुत्र्यांचा नसबंदी कार्यक्रम बंद
मोरजी (गोवा) येथे अनधिकृत बांधकाम पाडण्याच्या कारवाईच्या वेळी अधिवक्ता आणि तक्रारदार यांच्यावर जीवघेणे आक्रमण
अग्नीसुरक्षेचे नियमभंग करणारी भिवंडी येथील २ औद्योगिक आस्थापने ‘सील’ !
Pune Love-Jihad : हिंदु तरुणीला प्रेमजाळ्यात ओढण्याचा प्रयत्न करत सुफियान खान याच्याकडून मानसिक छळ !