नंदुरबार येथे वाळूचा ट्रक अडवल्याच्या कारणावरून आरोप !
नंदुरबार – ‘येथील भाजप नगरसेवक गौरव चौधरी यांनी वाळूचे ट्रक अडवल्याने महिला तलाठी निशा पावरा यांना शिवीगाळ करत मारहाण केली आहे’, असा आरोप पावरा यांनी चौधरी यांच्यावर केला आहे. तहसीलदार नियुक्त वाळू पडताळणी पथकात निशा पावरा काम करतात.
१. चौधरी यांच्याकडील वाळू वाहतूक करणार्या वाहनाकडे गुजरातमधून महाराष्ट्रात वाळू वाहतुकीची ‘झिरो स्वामीत्व’ पावती नव्हती.
त्याच्या पडताळणीसाठी पथकाने २ घंटे वाळू वाहतूक करणारा ट्रक अडवला. ट्रकचालकाने ट्रक पळवण्याचा प्रयत्न केला.
२. निशा पावरा यांच्यासह अन्य २ महिला तलाठी कर्मचार्यांनी तहसीलदारांच्या वाहनातून पाठलाग करून ट्रक अडवला. नगरसेवक गौरव चौधरी आणि महिला तलाठी यांमध्ये वाद झाला. चौधरी यांनी महिला तलाठी यांना शिवीगाळ करत धक्काबुकी करून मारहाण केली.
३. संतप्त तलाठींसह महसूल खात्यातील सर्व अधिकारी यांनी शहर पोलीस ठाण्यात ठाण मांडून चौधरी यांच्याविरुद्ध तक्रार दिली. त्यानंतर पोलिसांनी त्यांच्यावर गुन्हा नोंद केला आहे.
४. नगरसेवक गौरव चौधरी यांनी पथकावर वाळू ट्रक अडवून पैशांची मागणी करण्याचा आरोप केला आहे. आपण कुणालाही मारहाण केली नसून संबंधित महिला तलाठी पाय अडकून खाली पडल्याचा दावा त्यांनी केला आहे. त्यांच्या वाहनाच्या चालकांनी या प्रकरणी शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.
राखीव वनक्षेत्रात शिकार करणार्या ८ जणांना अटक
धर्मांधाचा तरुणीवर अत्याचार
भाजपची विचारसरणी सोडून अन्य पक्षात गेलेल्यांना भाजपमध्ये प्रवेश नाही ! – प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण
विटा (सांगली) येथे लसीकरणानंतर ४ महिन्यांच्या बालिकेचा मृत्यू; संतप्त नातेवाइकांचा रुग्णालयात ठिय्या !
सांगली येथे भरधाव चारचाकीची अनेक वाहनांना धडक; चालक पसार
नसरापूर प्रकरणी आरोपीने चिमुरडीच्या मृत्यूनंतरही मृतदेहावर केले अत्याचार !