यवतमाळ येथील गर्भवती वाघीण शिकार प्रकरणी ५ आरोपींना अटक !

क्रूरतेच्या सर्व सीमा ओलांडून गर्भवती वाघिणीची हत्या करणार्‍यांना कठोर शासनच द्यायला हवे !

वणी (यवतमाळ), २० जून – मांगुर्ला जंगलातील गर्भवती वाघीण शिकार प्रकरणातील ५ आरोपींना अटक केली आहे. ही कारवाई वणी पोलीस आणि पांढरकवडा वनविभाग यांनी संयुक्तपणे पार पाडली. वरपोड येथील नागो टेकाम, सोनु टेकाम, गोली टेकाम, बोनु टेकाम, तुकाराम टेकाम यांना पकडण्याची कारवाई पोलीस आणि वन विभागाचे कर्मचार्‍यांनी केली.