न्यायालयाने आरोपी विनोद शिवकुमार याचा जामीन अर्ज पुन्हा फेटाळला !

दीपाली चव्हाण आत्महत्या प्रकरण

अमरावती – जिल्ह्यातील मेळघाटातील वनपरिक्षेत्र अधिकारी दीपाली चव्हाण आत्महत्या प्रकरणी आरोपी उपवनसंरक्षक विनोद शिवकुमार याने अचलपूर न्यायालयात जामीन मिळवण्यासाठी प्रविष्ट केलेला अर्ज १९ जून या दिवशी सत्र न्यायाधीश एस्.के. मुंगीनवार यांनी फेटाळला आहे.

२३ एप्रिल या दिवशी न्यायालयाने शिवकुमार याच्या अटकपूर्व जामिनावर निर्णय देतांना त्याचा अर्ज फेटाळला होता. या प्रकरणी १७ जून या दिवशी दीपाली यांचे पती राजेश मोहिते यांच्या वतीने न्यायालयात अर्ज करण्यात आला होता, तर न्यायालयाने जामिनावरील युक्तीवाद लक्षात घेऊन सुनावणीसाठी १९ जून हा दिनांक निश्‍चित केला होता. यावर न्यायाधीश एस्.के. मुंगीनवार यांच्या न्यायालयाने दोषारोपपत्र प्रविष्ट झाल्यानंतर शिवकुमार याचा जामीन अर्ज फेटाळून लावला.