मुंबई – कांदिवली येथील हिरानंदानी सोसायटीमध्ये कोरोनावरील झालेल्या बोगस लसीकरणाच्या विरोधात मुंबई महानगरपालिकेने ‘सिरम इन्स्टिट्यूट’ला पत्र पाठवले आहे. या पत्रामध्ये लसीचे संबंधित क्रमांक विचारण्यात आले आहेत. यामुळे ‘सिरम इन्स्टिट्यूट’कडून या लसी कुणाला पुरवण्यात आल्या होत्या, याची माहिती मिळेल आणि त्यावरून ‘लसींचा पुरवठा कुणी केला ?’, हे कळू शकेल.
३० मे या दिवशी हिरानंदानी सोसायटीमधील रहिवाशांना लसीकरण केले होते; मात्र ज्या रुग्णालयाच्या नावे हे लसीकरण करण्यात आले, त्यांनी अशा प्रकारे लसीकरणाचे कोणतेही शिबिर राबवण्यात आले नाही, असे सांगितले. १२ जून या दिवशी हे लसीकरण बोगस असल्याचा प्रकार पुढे आला. सध्या या प्रकरणांचे अन्वेषण पोलीस करत आहेत.