आरोपींकडून १४ इंजेक्शने जप्त !
इंजेक्शनसारख्या गोष्टींचा वारंवार काळाबाजार होणे हे आरोग्य विभागाला लज्जास्पदच !
ठाणे, २० जून (वार्ता.) – म्युकरमायकोसिस या आजारावर परिणामकारक असलेल्या इंजेक्शनचा काळाबाजार करणारे अमरदीप सोनवणे आणि निखिल पवार या दोन आरोपींना कापूरबावडी पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडून विक्रीसाठी आणलेली १४ इंजेक्शने पोलिसांनी जप्त केली आहेत. या इंजेक्शनची मूळ किंमत ७ सहस्र ८०६ रुपये इतकी असून हे दोन्ही आरोपी १० सहस्र ५०० रुपयांना एक इंजेक्शन याप्रमाणे त्यांची विक्री करत होते. या प्रकरणी कापूरबावडी पोलीस पुुढील अन्वेषण करत आहेत.