ठाणे, ११ जून (वार्ता.) – सनातनचे १०३ वे संत पू. सदाशिव सामंतआजोबा (वय ८४ वर्षे) यांनी १० जून या दिवशी देहत्याग केला. ११ जून या दिवशी सकाळी ९.३० वाजता येथील स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. या वेळी पू. आजोबांच्या मुखमंडलावर तेज जाणवत होते आणि वातावरण चैतन्यमय झाले होते.