पुण्यातील शिवाजीराव भोसले सहकारी बँकेचा परवाना रिझर्व्ह बँकेकडून रहित

ठेवीदारांच्या हिताच्या दृष्टीने बँकेला व्यवसाय चालू ठेवण्याची अनुमती देता येणार नाही, असे रिझर्व्ह बँकेने म्हटले आहे. बँक अवसायनात काढण्याची प्रक्रिया तातडीने चालू करण्यात आली आहे.

चीनमध्ये पुन्हा कोरोनाचा वाढता संसर्ग

कोरोनाची उत्पत्ती झालेल्या चीनमध्ये पुन्हा एकदा कोरोनाचा संसर्ग पसरू लागला आहे. कोरोनाचे रुग्ण सापडू लागल्याने चीनमध्ये ग्वांगदोंग भागात अनेक निर्बंध लादण्यात आले आहेत.

सातारा जिल्ह्यात पुन्हा ८ जूनपर्यंत कडक दळणवळण बंदी

यामध्ये रुग्णालये, औषधालये, कृषी सेवा, उद्योग, पेट्रोल पंप आणि अत्यावश्यक सेवा वगळता सर्व प्रकारची दुकाने, शाळा, महविद्यालये, धार्मिक स्थळे, सार्वजनिक ठिकाणे बंदच रहाणार आहेत

संभाजीनगर जिल्ह्यात ‘म्युकरमायकोसिस’ रोगामुळे ५७ जणांचा मृत्यू !

जिल्ह्यात ‘म्युकरमायकोसिस’चे एकूण ६०८ रुग्ण आढळले आहेत. यातील ३४५ रुग्ण उपचार घेत असून २०६ जण बरे होऊन घरी परतले आहेत, तर ५७ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

माझी लढाई अ‍ॅलोपॅथीमधील माफियांच्या विरोधात ! – योगऋषी रामदेवबाबा

मी अ‍ॅलोपॅथी आणि डॉक्टर यांच्या विरोधात नाही. इंडियन मेडिकल असोसिएशनच्या विरोधात जाण्याचा प्रश्‍नच येत नाही; मात्र आमचा या क्षेत्रातील  माफियांना विरोध आहे. ते २ रुपयांचे औषध २ सहस्र रुपयांना विकत आहेत.

निधन वृत्त

विश्रामबाग येथील ‘सनातन प्रभात’च्या वाचक आणि हितचिंतक  सुस्मिता दिलीप इनामदार (वय ५१ वर्षे) यांचे ३१ मे या दिवशी अल्पशा आजाराने निधन झाले. सनातन परिवार इनामदार आणि पुजारी कुटुंबियांच्या दु:खात सहभागी आहे.

कोरोनामुक्त व्यक्तींनी पुढील ६ आठवडे कोणतेही शस्त्रकर्म करू नये ! – तज्ञांचा सल्ला

भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद आणि नॅशनल टास्क फोर्स फॉर कोविड-१९ च्या तज्ञांनी कोरोनातून मुक्त झालेल्या व्यक्तींना पुढील ६ आठवडे कोणतेही शस्त्रकर्म न करण्याचा सल्ला दिला आहे.

पुणे महापालिकेच्या विविध विभागांमध्ये समन्वय नसल्याने वारंवार रस्त्यांची खोदाई !

महापालिकेच्या भोंगळ कारभारामुळे नागरिकांच्या करातून जमा झालेल्या कोट्यवधी रुपयांच्या निधीचा होत असलेला अपव्यय भरून देण्याचे दायित्व कोण घेणार ?

९८ टक्के मुसलमान असणार्‍या लक्षद्वीपमध्ये ११ वर्षांपासून म. गांधी यांचा पुतळा स्थापन करण्याचे काम प्रलंबित !

भारतीय न्यायव्यवस्थेला समांतर अशी शरीयत न्यायव्यवस्था मानणारे धर्मांध ! ९८ टक्के अल्पसंख्यांकांची लोकवस्ती असणारे लक्षद्वीप बेट उद्या भारतापासून वेगळे झाल्यास आश्‍चर्य वाटणार नाही !

पुण्यात जुगार खेळणार्‍या २ माजी नगरसेवकांसहित १९ जणांना अटक

अशा लोकप्रतिनिधींनी त्यांच्या कार्यकाळात समाजाला काय दिशा दिली असेल, याचा विचारच न केलेला बरा ! ही अनैतिकतेची कीड मुळापासून नष्ट करण्यासाठी समाजाला धर्मशिक्षण देणे, तसेच कायद्याचा धाक निर्माण करणे आवश्यक आहे !