कोरोनासह प्रत्येक व्याधीवर उपचार करतांना त्यामागील आध्यात्मिक कारणांचा विचार होणे आवश्यक ! – डॉ. ज्योती काळे, सनातन संस्था

कोरोनाच्या संदर्भात आवश्यक काळजी आणि वैद्यकीय उपचार घेण्यासह नामस्मरणादी उपायही केले पाहिजेत. कोरोना काळात रुग्णांवर औषधोपचार करणार्‍या डॉक्टरांना सततचे काम आणि स्वत:सह कुटुंबियांना कोरोनाची लागण होण्याची भीती यांमुळे प्रचंड तणावाला सामोरे जावे लागत आहे.

‘म्युकरमायकोसिस’वरील ‘एम्फोटेरेसीन-बी इंजेक्शन’चे वितरण ३१ मेपासून चालू होणार !

देशात कोरोनानंतर ‘म्युकरमायकोसिस’च्या रुग्णसंख्येमध्ये भर पडत असल्याने त्याच्यावर मिळणार्‍या ‘एम्फोटेरेसीन-बी’ इंजेक्शनचा तुटवडा मोठ्या प्रमाणात निर्माण होत आहे.

धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्यावर आक्षेपार्ह लिखाण करणारे गिरीश कुबेर यांच्यावर गुन्हा नोंद करा !

‘लोकसत्ता’चे संपादक गिरीश कुबेर यांनी ‘रिनैसंस द स्टेट’ या पुस्तकामध्ये धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्याविषयी चुकीची आणि त्यांची अपकिर्ती करणारी माहिती दिली आहे

पदोन्नतीतील आरक्षणावर तिन्ही पक्षांची भूमिका वेगवेगळी ! – देवेंद्र फडणवीस, विरोधी पक्षनेते

‘राज्यातील महाविकास आघाडी सरकारमधील काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना या पक्षांची पदोन्नती आरक्षणाच्या सूत्रावरून वेगवेगळी भूमिका दिसून येत आहे. सरकारची भूमिका नेहमीच दुटप्पीपणाची राहिली आहे.

दुर्घटनेला ५ वर्षे पूर्ण होऊनही पीडित हानीभरपाईपासून वंचित !

डोंबिवली औद्योगिक वसाहतीत असलेल्या ‘प्रोबेस एंटरप्राईजेस’ या रासायनिक कारखान्यात २६ मे २०१६ या दिवशी सकाळी ११.४० वाजता शक्तीशाली स्फोट झाला होता. या घटनेला ५ वर्षे पूर्ण झाली; मात्र या दुर्घटनेतील पीडित अद्यापही हानीभरपाईपासून वंचित आहेत….

जळगाव येथील भाजपच्या १० नगरसेवकांचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश

२६ मे या दिवशी जळगाव येथील भाजपच्या १० नगरसेवकांनी मुंबई येथे मुख्यमंत्र्यांच्या वर्षा या निवासस्थानी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला.

नागपूर येथे ‘टॉसिलीझुमॅब’ इंजेक्शनचा काळाबाजार करतांना तिघांना अटक

येथे ‘टॉसिलीझुमॅब’ इंजेक्शनचा काळाबाजार करणार्‍या होमिओपॅथीच्या २ आधुनिक वैद्यांसह तिघांना पोलिसांनी २६ मे या दिवशी अटक केली आहे. पोलीस उपायुक्त विनीता साहू यांच्या पथकाने ही कारवाई केली.

आर्णी (यवतमाळ) येथे महिलेवर अत्याचार करून त्याचा व्हिडिओ प्रसारित करणार्‍या एकाला अटक, दोन धर्मांध पसार !

तालुक्यातील डेहणी येथील ४५ वर्षीय महिलेवर ६ मे या दिवशी आरोपी अमोल आठवले (वय ३९ वर्षे) याने अत्याचार केला. कायदा-सुव्यवस्थेचा धाक नसल्याचाच हा दुष्परिणाम !

श्री शिवप्रतिष्ठान, हिंदुस्थानच्या वतीने पुणे येथे गिरीश कुबेर यांच्या विरोधात जिल्हाधिकार्‍यांकडे निवेदन

गिरीश कुबेर यांनी ‘रिनैसंस द स्टेट’ या त्यांच्या पुस्तकात धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्याविषयी आक्षेपार्ह लिखाण केले आहे. त्या विरोधात राज्यात हिंदुत्वनिष्ठांमध्ये संतापाची लाट आहे.

राज्यातील दळणवळणबंदी कायम राहील; मात्र निर्बंध काही प्रमाणात शिथील होतील ! – राजेश टोपे, आरोग्यमंत्री

राज्यातील दळणवळणबंदी सरसकट हटवली जाणार नाही; मात्र निर्बंध काही प्रमाणात शिथील होतील, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली