
पुणे – गिरीश कुबेर यांनी ‘रिनैसंस द स्टेट’ या त्यांच्या पुस्तकात धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्याविषयी आक्षेपार्ह लिखाण केले आहे. त्या विरोधात राज्यात हिंदुत्वनिष्ठांमध्ये संतापाची लाट आहे. या पार्श्वभूमीवर २५ मे या दिवशी श्री शिवप्रतिष्ठान, हिंदुस्थानच्या वतीने येथील जिल्हाधिकारी जयश्री कटारे यांना संघटनेचे पुणे जिल्हा प्रमुख संजय जढर आणि कार्यकर्ते यांनी निवेदन दिले. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज आणि महाराणी सोयराबाई यांच्यावर आक्षेपार्ह लिखाण करणारे पत्रकार गिरीश कुबेर यांच्या पुस्तकावर ताबडतोब बंदी घालावी, तसेच महाराष्ट्राचे सामाजिक वातावरण दूषित करण्याचा प्रयत्न करणारे समाजद्रोही लेखक गिरीष कुबेर यांना तात्काळ अटक करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
खड्डे तक्रारीचे ‘पी.एम्.सी. रोड मित्र’ अॅप ४ महिन्यांपासून बंद !
कोस्टल रोडवरील बोगद्यात चारचाकीला आग; वाहने सोडून लोकांचे पलायन !
थोडक्यात महत्त्वाचे (दि : १६ .०७.२०२६)
एन्.एम्.एम्.टी.च्या इलेक्ट्रिक बसला आग
श्री महालक्ष्मीदेवी मंदिराच्या जतन-संवर्धन कामात भारतीय पुरातत्वीय निकष आणि शास्त्रोक्त संवर्धन पद्धती यांचे काटेकोर पालन व्हावे ! – सकल हिंदु समाजाचे निवेदन
सोलापूर येथील वैष्णवी मंदिर परिसरातील महाकाय वटवृक्ष आगीपासून वाचला !