सांगली जिल्हा परिषदेतील लिपिक अरुण कुशिरे यांना २५ सहस्र रुपयांची लाच घेतांना पकडले !

जिल्हा परिषदेतील लिपिक अरुण योगीनाथ कुशिरे यांना २१ मे या दिवशी अनामत रक्कम परत करण्याच्या मोबदल्यासाठी लाच घेतांना पकडण्यात आले.

कोल्हापूर शहरातील कोरोना केंद्रात रुग्णांना विनामूल्य उपचार !

गंभीर लक्षणे नसलेल्या रुग्णांना १२ कोरोना केंद्रात भोजन, औषध आणि वैद्यकीय सेवा विनामूल्य दिली जात आहे.

निधन वार्ता

हिंदुत्वनिष्ठ आणि सनातन संस्थेचे हितचिंतक श्री. किरण कुलकर्णी यांच्या मातोश्री श्रीमती रोहिणी भालचंद्र कुलकर्णी (वय ७० वर्षे) यांचे २१ मे या दिवशी निधन झाले.

कोल्हापूर शहरातील घरपोच भाजीपाला नियोजन कोलमडले

महापालिकेने घरपोच भाजीपाला देण्यासाठी केलेले नियोजन पूर्णपणे कोलमडले आहे. पहिले २ दिवस शहरातील काही भागात भाजी विक्रेते भाजी घेऊन येत होते.

२७ मेपासून सांगली जिल्ह्यातील छोट्या मोठ्या सर्व व्यापारी वर्गाला सकाळी १० ते सायंकाळी ५ पर्यंत दुकाने उघडण्यास अनुमती द्या ! – सुधीर गाडगीळ, आमदार, भाजप

महापूर आणि यानंतर सलग २ वर्ष कोरोनाच्या आपत्तीचा तडाखा यांमुळे व्यापारी आर्थिकदृष्ट्या खचले आहेत.

परवानाधारक रिक्शा व्यावसायिकांना शासनाकडून १ सहस्र ५०० रुपयांचे साहाय्य !

सांगली जिल्हा रिक्शा व्यवसाय बचाव कृती समितीच्या लढ्याला यश आले असून रिक्शा व्यावसायिकांना साहाय्य घोषित झाले आहे.

उजनीच्या पाणी प्रश्‍नावरून शेतकर्‍यांचे ‘रास्ता रोको’ आंदोलन !

उजनीतील ५ टी.एम्.सी. पाणी इंदापूरला देण्याचा निर्णय रहित करण्यात आल्याने तालुक्यातील शेतकरी आक्रमक झाले आहेत.

सोलापूर येथील नवनीत रुग्णालयाला महापालिकेकडून नोटीस

नवनीत या खासगी रुग्णालयातील रुग्ण परिसरात मुक्तपणे फिरत असून रोगाचा प्रसार करत असल्याने महानगरपालिकेकडून रुग्णालयाला नोटीस देण्यात आली आहे.

जिल्ह्यातील मुलांच्या ‘हिमोग्लोबिन’ची तपासणी करण्यात येणार !

लहान मुलांचे ‘हिमोग्लोबिन’ न्यून असल्यास त्यांना कोरोनाचा अधिक संसर्ग होण्याची भीती असल्याने १८ वर्षे वयाखालील सर्व मुलांची ‘हिमोग्लोबिन’ तपासणी करणार.

श्री तुळजाभवानी मंदिरातील पुजारी कुटुंबासाठी १० सहस्र रुपये अनुदान द्या !

मंदिर बंद असल्याने अडचणीत असलेल्या पुजारी कुटुंबांना प्रत्येकी १० सहस्र रुपयांचे अनुदान देण्याची मागणी जिल्हाधिकार्‍यांकडे केली आहे.