सोलापूरचे पालकमंत्री दत्तात्रेय भरणे यांची माहिती

सोलापूर – कोरोनाच्या तिसर्या लाटेविषयी केंद्र सरकारच्या आरोग्य विभागाने लहान मुलांना अधिक धोका असल्याचे सांगितले आहे. लहान मुलांचे ‘हिमोग्लोबिन’ न्यून असल्यास त्यांना अधिक संसर्ग होण्याची भीती असल्याने जिल्ह्यातील १८ वर्षे वयाखालील सर्व मुलांची ‘हिमोग्लोबिन’ तपासणी करणार असल्याचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी सांगितले. येथील नियोजन भवन येथे कोरोनाविषयक आढावा बैठकीत भरणे बोलत होते. या वेळी जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, पोलीस आयुक्त अंकुश शिंदे, महापालिका आयुक्त पी. शिवशंकर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. शीतलकुमार जाधव, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. प्रदीप ढेले, लसीकरण समन्वयक डॉ. अनिरुद्ध पिंपळे यांच्यासह विभागप्रमुख उपस्थित होते.

या वेळी श्री. भरणे म्हणाले की, कोरोनाचा लहान मुलांना संसर्ग होऊ नये, यासाठी सतर्क रहावे. जिल्ह्यात ० ते १८ वयोगटातील बालके ११ लाख ९२ सहस्र एवढी असून लहान मुलांसाठी शासकीय रुग्णालयामध्ये ४० खाटांची सोय करण्यात आली. जिल्ह्यातील ग्रामीण भागात १३ लहान मुलांचे दवाखाने अधिग्रहित करण्यात आले असून यामध्ये २४० खाटांची तात्पुरती सोय केली आहे. सोलापूर शहरात १६ दवाखाने अधिग्रहित करून यामध्ये ४०९ खाटांची सोय करण्यात आली आहे.
केपे येथील नागरिकांची भूमी व्यवहारामध्ये ५६ लाखांची फसवणूक
सावंतवाडी शहरात गटारे तुंबल्याने पावसाचे पाणी रस्त्यावर
कुर्टी, फोंडा येथील ‘सपना पार्क’ रहिवाशांचा आश्वासन देऊनही पाण्याचा प्रश्न कायम
तळोजा येथे गोवंशियांच्या मांसाची अवैध वाहतूक; धर्मांधाविरुद्ध गुन्हा नोंद
कल्याण येथे मद्यधुंद तरुणाकडून पोलीस कर्मचार्यावर जीवघेणे आक्रमण !
वर्ष २०३० पर्यंत विदेशी रुग्णांसाठी भारत होणार दीड लाख कोटी रुपयांची बाजारपेठ !