हे हनुमंता, हिंदु राष्ट्र स्थापण्या दे आम्हा दास्यभाव अन् क्षात्रभाव यांचे वरदान !
रामचरणांच्या नित्य अनुसंधानात रहाणार्या महातेजस्वी हनुमंता, रामभक्ती आणि वीरवृत्ती यांच्या बळावर तू राक्षसांचा निःपात करून रामरायाचे धर्मसंस्थापनेचे ध्येय पूर्ण केले.