देहलीमध्ये ७० सहस्र रुपयांना रेमडेसिविर विकणार्‍या ३ मेडिकल दुकानदारांना अटक

संकटाच्या समयी लोकांना अशा प्रकारे लुटणार्‍यांना फाशीचीच शिक्षा करायला हवी !

देहलीत रेमडेसिविर इंजेक्शन ७० सहस्र रुपयांना विकणारे ३ मेडिकल दुकानदार

नवी देहली – देशभरात रेमडेसिविर इंजेक्शनचा मोठ्या प्रमाणात तुटवडा जाणवत असल्यामुळे त्याचा मोठ्या प्रमाणात काळाबाजार करण्यात येत आहे. असे करणार्‍यांना अटक करण्यात आली होती. आता देहलीत रेमडेसिविर इंजेक्शन ७० सहस्र रुपयांना विकणार्‍या ३ मेडिकल दुकानदारांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडून ७ इंजेक्शन जप्त करण्यात आली आहेत. कोरोनाग्रस्त रुग्णांना रेमडेसिविर इंजेक्शनचे ६ डोस द्यावे लागतात.