राष्ट्रमाता जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद यांच्या जयंती निमित्ताने विविध कार्यक्रमांचे आयोजन

मिरज, ११ जानेवारी (वार्ता.) – प्रतिवर्षीप्रमाणे नदीवेस, पवार गल्ली येथील विठ्ठल मंदिरात राष्ट्रमाता जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद यांच्या जयंती निमित्ताने १२ ते १६ जानेवारीपर्यंत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. १२ जानेवारी या दिवशी ज्येष्ठ पत्रकार श्री. नामदेव भोसले (अध्यक्ष – शब्दांगण साहित्य व्यासपीठ, मिरज) यांच्या हस्ते सायंकाळी ६ वाजता प्रतिमापूजन आणि दीपप्रज्वलन होणार आहे. या ५ दिवसीय सोहळ्यामध्ये प्रतिदिन सायंकाळी ७ ते रात्री ९ या वेळेत भजन, कीर्तन, प्रवचन, हळदी-कुंकू, महाप्रसाद असे विविध कार्यक्रम होणार आहेत.

१६ जानेवारी या दिवशी सकाळी ९ वाजता छत्रपती संभाजीराजे राज्याभिषेक दिनानिमित्त मूर्तीपूजन होईल आणि रात्री ९ ते ११ महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. तरी परिसरातील सर्व राष्ट्रभक्त आणि शिवभक्त यांनी कार्यक्रमास उपस्थित रहावे, असे आवाहन श्री विठ्ठल मंदिर, श्री शिवाजी तरुण मंडळ आणि अखिल भारतीय मराठा महासंघ यांच्या वतीने करण्यात आले आहे.