८ मासांनंतर शनिशिंगणापूरमध्ये भाविकांचे मोठ्या संख्येत शनिदर्शन

३ दिवसांच्या सलग सुट्ट्यांच्या कालावधीत शनिशिंगणापूर मंदिर परिसरात पुष्कळ गर्दी होती. नाताळला प्राधान्य न देता ७० सहस्रांहून अधिक हिंदु भाविकांनी आनंदाने शनिदर्शन घेतले. सकाळी आठ वाजता चालू झालेला दर्शनाचा ओघ रात्री उशिरापर्यंत टिकून होता.

३१ डिसेंबर साजरा न करण्याच्या निमगाव ग्रामस्थांच्या या निर्धाराचे ग्रामपंचायतीकडून कौतुक !

हिंदूंनी पाश्चात्य संस्कृतीला हद्दपार करून हिंदु धर्मानुसार आचरण करावे = हिंदु जनजागृती समिती

 राज्य परिवहन मंडळाला मिळणार्‍या कर्जाचा प्रस्ताव स्थगित ?

बँकेकडून कर्जासाठी राज्य सरकारकडून हमी मिळत नसल्याने प्रस्ताव रखडला

३१ डिसेंबरला गडकोट, ऐतिहासिक आणि सार्वजनिक ठिकाणी मद्यपान, धूम्रपान, ‘पार्ट्या’ करणे यांना प्रतिबंध करा !

धर्मप्रेमींचे पन्हाळा नायब तहसीलदार आणि पोलीस निरीक्षक यांना निवेदन

चिंचोळे, पणजी येथील श्री दत्तजयंती उत्सव

चिंचोळे, पणजी येथील श्री क्षेत्र पिंपळेश्‍वर दत्तमंदिरात २९ डिसेंबरला दत्तजयंती उत्सव साजरा होत आहे. त्यानिमित्त पिंपळेश्‍वर दत्त मंदिराविषयी थोडक्यात माहिती येथे देत आहोत.

नेपाळी नाट्य !

नेपाळमधील सरकार अस्थिर झाल्यामुळे चीनचे धाबे दणाणले आहेत. ओली चीनच्या मर्जीतले. पुढे निवडणूक होऊन ते पराभूत झाल्यास नेपाळवर चीनचे असलेले नियंत्रण सुटेल, अशी चीनला भीती वाटत आहे. चीनला ते नको आहे.

पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते उद्घाटन करून देहलीत चालू झाली चालकविरहित मेट्रो !

देहलीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पहिल्या स्वयंचलित म्हणजे चालकविरहित मेट्रोचे उद्घाटन करण्यात आले. या मेट्रो ट्रेनला पंतप्रधान मोदी यांनी हिरवा झेंडा दाखवला. ही मेट्रो ३७ किमीपर्यंत धावणार आहे. या मेट्रोला संपूर्णपणे ऑटोमॅटिक सिस्टिम आहे. मेट्रोच्या ‘मॅजेन्टा लाइन’ आणि ‘पिंक लाइन’ यांवर ही मेट्रो चालवली जाणार आहे.

धवडकी (सावंतवाडी) येथील श्री दत्तमंदिर

सावंतवाडी येथील कै. बाबी अंधारी यांच्या हस्ते १३ डिसेंबर १९४५ या दिवशी धवडकी येथे सावंतवाडी-बेळगाव राज्यमार्गाच्या बाजूला औदुंबर वृक्षाखाली एका घुमटीत श्री दत्तगुरूंची मूर्ती स्थापन करण्यात आली.

तपोभूमी येथे श्री दत्तजयंतीच्या निमित्ताने श्री दत्त भिक्षा-शिधा समर्पण विधी

श्री क्षेत्र तपोभूमी गुरुपीठ येथून श्री दत्तजयंती महोत्सवाचे Shree Datta Padmanabh Peeth या ‘फेसबूक पेज’वरून थेट प्रक्षेपण करण्यात येणार आहे. भाविकांची याचा लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.