कुंडई, २८ डिसेंबर (वार्ता.) – येथील श्री दत्त पद्मनाभ पीठ येथे पिठाधीश्वर धर्मभूषण सद्गुरु ब्रह्मेशानंदाचार्य स्वामी महाराज यांच्या पावन उपस्थितीत २९ डिसेंबर या दिवशी श्री दत्तजयंती महोत्सव साजरा केला जाणार आहे. या निमित्ताने सकाळच्या सत्रात वैदिक ब्रह्मवृंदांद्वारे श्रीदत्त महायाग, गुरुचरित्र पारायण, सद्गुरु पूजन, दत्तभिक्षा समर्पण आणि महाआरती, तर सायंकाळच्या सत्रात श्री दत्तप्रभूंची राजोपचार महापूजा, श्री दत्तदक्षिणा समर्पण, पालखी उत्सव, पू. सद्गुरूंचे आशीर्वचन आणि आरती होणार आहे. सर्व हिंदु धर्मियांनी घरोघरी महोत्सव पूजा-अर्चा, गुरुचरित्र पारायण आणि जपानुष्ठान करून श्री दत्तजयंती महोत्सव साजरा करावा. श्री क्षेत्र तपोभूमी गुरुपीठ येथून श्री दत्तजयंती महोत्सवाचे Shree Datta Padmanabh Peeth या ‘फेसबूक पेज’वरून थेट प्रक्षेपण करण्यात येणार आहे. भाविकांची याचा लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.