‘गुरुचरणी’ साधक शरणागत होऊनी राही ।

‘गुरुचरणा’विण जीवन व्यर्थ जाई ।
‘गुरुचरणी’ मिळतसे सर्वकाही ।
‘गुरुचरणी’ साधक शरणागत होऊनी राही ॥

श्रीचित्‌शक्‍ति (सौ.) अंजली गाडगीळ यांच्याकडून कर्नाटक राज्यातील मंदिरांत साधकांच्या रक्षणासाठी प्रार्थना !

परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या ‘आध्यात्मिक उत्तराधिकारी’ श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांचा मार्गशीर्ष शुक्ल पक्ष चतुर्दशी (२९.१२.२०२०) या दिवशी वाढदिवस आहे.

दत्तात्रेयांची कथा

अनसूया महान पतिव्रता आहे. ती ध्यान करते. जप करते. अभिमंत्रित जल घेते. तिन्ही देवांच्या अंगांवर पाणी शिंपडते. तिघे देव बालक होतात. पतिव्रत्याची, परमपावित्र्याची आणि तपस्येची ही ताकद आहे.

देवतांच्या जयंतीच्या दिवशी ‘ऑनलाईन’ सत्संगात धर्मप्रेमींकडून त्या देवतांचे नामजप करून घ्यावे !

देवतांच्या जयंतीच्या दिवशी ‘ऑनलाईन’ सत्संगात त्या देवतांचे नामजप करून घेऊ शकतो, जसे श्रीरामनवमीच्या दिवशी ‘श्रीरामा’चा. २९.१२.२०२० या दिवशी दत्तजयंती आहे. त्या दिवशी ‘श्री गुरुदेव दत्त ।’ हा नामजप करून घेऊ शकतो. 

श्री क्षेत्र दत्तवाडी, केपे येथील श्री दत्तजयंती उत्सव !

यंदा २८ डिसेंबरला २४ घंट्यांच्या अखंड नामस्मरण सप्ताहास प्रारंभ झाला असून २९ डिसेंबरला सकाळी ११ वाजता त्याची सांगता होईल. यावर्षी दत्तजयंतीचा उत्सव कै. शशिकांत महादेव नाईक, कुंकळ्ळी यांच्या कुटुंबियांकडून साजरा केला जाणार आहे.

कुठ्ठाळी येथील श्री दत्तगुरु देवस्थान

झुवारी पुलाच्या जवळ असलेले गाव कुठ्ठाळी येथे श्री गुरुदेव दत्ताचे मंदिर आहे. या मंदिरात २९ डिसेंबर या दिवशी सायं. ५.३० वाजता श्री दत्तजन्म उत्सव साजरा करण्यात येणार आहे, तर ३० डिसेंबर या दिवशी दुपारी १२ वाजता श्री सत्यदत्त व्रत पूजा असणार आहे.

दत्त हाच खरा मोक्षगुरु

श्रीपाद श्रीवल्लभ’ हा दत्ताचा पहिला अवतार आणि श्री नृसिंह सरस्वती’ हा दुसरा अवतार होय. तसेच माणिकप्रभु’ तिसरे आणि श्री स्वामी समर्थ महाराज’ हे चौथे अवतार होत. हे चार पूर्ण अवतार असून अंशात्मक अवतार अनेक आहेत.