पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते उद्घाटन करून देहलीत चालू झाली चालकविरहित मेट्रो !

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पहिल्या स्वयंचलित मेट्रोचे उद्घाटन करण्यात आले.

नवी देहली – देहलीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पहिल्या स्वयंचलित म्हणजे चालकविरहित मेट्रोचे उद्घाटन करण्यात आले. या मेट्रो ट्रेनला पंतप्रधान मोदी यांनी हिरवा झेंडा दाखवला.

ही मेट्रो ३७ किमीपर्यंत धावणार आहे. या मेट्रोला संपूर्णपणे ऑटोमॅटिक सिस्टिम आहे. मेट्रोच्या ‘मॅजेन्टा लाइन’ आणि ‘पिंक लाइन’ यांवर ही मेट्रो चालवली जाणार आहे. या ट्रेनचा वेग ८५ ते ९५ किलोमीटर प्रतिघंटा असणार आहे. देहलीतील मेट्रोचे जाळे हे जगातील सर्वांत मोठे जाळे असल्याचे म्हटले जाते.