सांगवे सोसायटीची रास्त भाव धान्य दुकानाची अनुज्ञप्ती रहित

  • रास्त भाव धान्य दुकानातील धान्याचा काळाबाजार होत असल्याचा आरोप

  • खासदार विनायक राऊत यांनी केली होती तक्रार

कणकवली – तालुक्यातील सांगवे सोसायटीच्या रास्त भाव धान्य दुकानाची अनुज्ञप्ती जिल्हा पुरवठा अधिकार्‍यांनी रहित केली आहे. याविषयी शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांनी जिल्हा पुरवठा अधिकारी यांच्याकडे तक्रार केली होती, अशी माहिती शिवसेना तालुकाप्रमुख डॉ. प्रथमेश सावंत यांनी दिली.

सांगवे येथील रास्त भाव धान्य दुकानातील धान्य टेम्पोतून अन्यत्र घेऊन जात असतांना ८ डिसेंबरला काही शिवसैनिकांसह ग्रामस्थांनी संशयितांना पकडले होते. त्यानंतर तातडीने पुरवठा अधिकारी नितीन डाके, मंडळ अधिकारी डी.एम्. पाटील आदींनी घटनास्थळी भेट देऊन रास्त भाव धान्य दुकानाची तपासणी केली. या तपासणीत धान्यसाठ्यात तफावत आढळून आल्याने डाके यांनी दिलेल्या तक्रारीनुसार सेल्समन सुनील हरि तोरस्कर आणि वाहनचालक सुमित देवानंद मयेकर (रहाणार जामसंडे, देवगड) यांच्यावर पोलिसांनी कारवाई केली होती.