सिंधुदुर्ग – बहुप्रतिक्षित कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणाविषयी जिल्हा प्रशासनाने नियोजन पूर्ण केले आहे. त्या अनुषंगाने लस देण्याचा प्राधान्यक्रम ठरवण्यात आला आहे. याविषयी जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी १६ डिसेंबरला सविस्तर आढावा घेऊन सूचना दिल्या.
कोरोना लसीकरणाचा प्राधान्यक्रम
जिल्ह्यातील सर्व शासकीय आरोग्य संस्थांमध्ये काम करणारे डॉक्टर आणि कर्मचारी यांना प्रथम लस देण्यात येणार आहे. त्यानंतर मुंबई नर्सिंग अॅक्ट अंतर्गत खासगी नोंदणीकृत डॉक्टर आणि त्यांचे कर्मचारी यांना, ‘कोविड’ संदर्भात काम केलेले प्रशासकीय अधिकारी अन् कर्मचारी यांना, ५० वर्षांवरील आणि असांसर्गिक आजारी असलेल्या व्यक्ती याप्रमाणे प्राधान्यक्रम ठरवण्यात आला आहे. या प्राधान्यक्रमानंतर सर्वसामान्य नागरिकांना टप्प्याटप्प्याने लस टोचण्यात येणार आहे.