धर्मांतराचे षड्यंत्र करणार्‍यांना तोडून टाकू ! – मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान

भाजपच्या मुख्यमंत्र्यांकडून हिंदूंना हेच अपेक्षित आहे !

मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान

सीहोर (मध्यप्रदेश) – आमचे सरकार सर्वांसाठी आहे. धर्म अथवा जाती यांद्वारे राज्यात भेदभाव केला जाणार नाही; मात्र आमच्या मुलींसमवेत कुणी वाईट करत असेल, तर त्यांना तोडून टाकू, अशी चेतावणी मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी येथे एका सभेमध्ये दिली. ‘धर्मांतर अथवा लव्ह जिहादचे षड्यंत्र रचणार्‍यांना मध्यप्रदेशमध्ये कोणतीही जागा नाही. कुणी असा प्रयत्न केला, तर त्याला उद्ध्वस्त करू’, अशीही चेतावणी त्यांनी दिली.