गरीब हिंदूंना आमीष दाखवून त्यांचे धर्मांतर करणार्‍या पाद्रयाला अटक !

हिंदूंचे अशा प्रकारे धर्मांतर झाल्याने ईशान्य भारतातील राज्ये आज ख्रिस्तीबहुल झाल्याने तेथे देशविरोधी कारवाया चालू झाल्या आहेत. संपूर्ण देशातच ही स्थिती निर्माण होण्यापूर्वी भारताला हिंदु राष्ट्र बनवणे अपरिहार्य आहे, हे हिंदूंनी लक्षात घ्यावे !

(म्‍हणे) ‘गावात घुसणार्‍या अन्‍वेषण यंत्रणेच्‍या अधिकार्‍यांचे हात-पाय तोडा !’

चिथावणी देणार्‍या व्‍यक्‍तीचे नाव जाबिर घाटमिका असून तो हरियाणातील नूंह येथील रहिवासी असल्‍याचे सांगितले जात आहे. या प्रकरणी पोलिसांत तक्रार प्रविष्‍ट करण्‍यात आली आहे.

केवळ ५६ टक्‍के भारतीयच ईश्‍वराला मानतात ! – सर्वेक्षण

विविध देशांतील किती टक्‍के लोक ईश्‍वराला मानतात, यासंदर्भात नुकतेच एक सर्वेक्षण करण्‍यात आले. ‘द वर्ल्‍ड ऑफ स्‍टॅटिस्‍टिक्‍स’च्‍या ट्‍विटर खात्‍यावरून या संदर्भातील आकडेवारी मांडण्‍यात आली आहे.

समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी यांचे विधान

‘द काश्‍मीर फाइल्‍स’ हा चित्रपट खोट्या कथेवर आधारित आहे. मागील ३० वर्षांत काश्‍मीरमध्‍ये ७००-८०० मुसलमान मारले गेले आहेत आणि केवळ ८९ हिंदु पंडित हुतात्‍मा झाले आहेत, असे विधान समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी यांनी महाराष्‍ट्राच्‍या विधानसभेत केले.

पंतप्रधान मोदींकडून काँग्रेसच्‍या विरोधात ‘क्‍विट इंडिया’ची घोषणा !

राजस्‍थानमध्‍ये येऊ घातलेल्‍या विधानसभा निवडणुकीच्‍या पार्श्‍वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी येथील शेखावटी भागात निवडणूक प्रचारास आरंभ केला.

संजयकुमार मिश्रा यांच्‍या ‘ईडी’च्‍या संचालकपदाचा कार्यकाळ १५ सप्‍टेंबरपर्यंत वाढवला !

‘ईडी’, म्‍हणजेच अंमलबजावणी संचालनालयाचे संचालक संजयकुमार मिश्रा यांच्‍या कार्यकाळात १५ सप्‍टेंबरपर्यंत वाढ करण्‍याची अनुमती सर्वोच्‍च न्‍यायालयाने दिली आहे. केंद्रशासनाने न्‍यायालयाकडे याविषयीची मागणी केली होती.

३३ वर्षांनंतर श्रीनगरमधील संवेदनशील लाल चौकातून गेली मोहरमची मिरवणूक !

मोहरमनिमित्त शिया मुसलमानांनी २७ जुलै या दिवशी तब्‍बल ३३ वर्षांनी लाल चौकातून मिरवणूक काढली. यामध्‍ये शेकडो लोक सहभागी झाले होते. या मिरवणुकीला ‘ताजिया’ म्‍हटले जाते.

नेवासा (अहिल्‍यानगर) येथे गोरक्षकांच्‍या सतर्कतेमुळे ४ म्‍हशींना कत्तलीपासून जीवनदान !

ऋषिकेश भागवत यांनी नेवासा पोलीस ठाण्‍याचे पोलीस निरीक्षक डोईफोडे यांना याविषयी माहिती कळवताच पोलिसांच्‍या साहाय्‍याने वाहनचालकाला कह्यात घेऊन त्‍याच्‍यावर गुन्‍हा नोंद करण्‍यात आला आहे.

कर्करोगाला धीरोदात्तपणे सामोरे जाणार्‍या सनातनच्‍या साधिका वैद्या सुश्री (कु.) सुजाता जाधव (आध्‍यात्मिक पातळी ६१ टक्‍के) यांचे निधन !

वैद्या सुश्री (कु.) सुजाता जाधव या आयुर्वेदात एम्.डी. होत्‍या. त्‍या धाराशिव येथील शासकीय आयुर्वेद महाविद्यालयात साहाय्‍यक प्राध्‍यापिका म्‍हणून ५ वर्षांपासून कार्यरत होत्‍या.

राज्‍यभर पावसाचा जोर कायम !

मुंबई, ठाणे आणि रायगड या जिल्‍ह्यांना अतीदक्षतेची चेतावणी देण्‍यात आली आहे. यवतमाळ, पालघर, चंद्रपूर यांना ‘ऑरेंज अलर्ट’ देण्‍यात आला आहे.