वैद्यांना शस्त्रकर्म करण्यासाठी दिलेली अनुमती रहित न केल्यास देशव्यापी आंदोलन करू ! – इंडियन मेडिकल असोसिएशनची चेतावणी

भारतीय वैद्यक परिषदेने आयुर्वेदीय वैद्यांना शस्त्रकर्म करण्यासाठी दिलेली अनुमती रहित न केल्यास महाराष्ट्रासह देशव्यापी आंदोलन करू, अशी चेतावणी इंडियन मेडिकल असोसिएशनने दिली आहे.

भाजपची विशेष राज्य कार्यकारिणी सभा ५ डिसेंबर या दिवशी बेळगावात

भारतीय जनता पक्षाची विशेष राज्य कार्यकारिणी सभा ५ डिसेंबर या दिवशी बेळगाव शहरात होत आहे.

विकिपीडियाकडून भारताच्या मानचित्रातील ‘अक्साई चीन’ला चीनमध्ये दाखवले !

‘विकिपीडिया’ या संकेतस्थळावरील भारताच्या मानचित्रामध्ये अक्साई चीनला चीनच्या मानचित्रात दाखवल्याने भारत सरकारने आक्षेप घेत हे मानचित्र हटवण्याचा आदेश दिला आहे.

अन्नधान्याच्या संकटामुळे चीन अनेक वर्षांनंतर भारताकडून तांदूळ खरेदी करणार

चीनने विज्ञानामध्ये कितीही प्रगती केली, शेजारी देशांवर अतिक्रमण केले, तरी पोटाची भूक भागवण्यासाठी त्याचा वापर होऊ शकत नाही, हे आता त्याच्या लक्षात येईल, हीच अपेक्षा ! ३ दशकांत चीनने प्रथमच भारताकडून तांदळाची आयात करण्यास प्रारंभ केला आहे.

ब्रिटनमध्ये जाऊन कोरोना लस घेण्यासाठी भारतियांची ट्रॅव्हल एजंट्सकडे चौकशी

कोरोनाची लस भारतात मिळण्यासाठी अद्याप काही मास लागणार आहेत; मात्र ब्रिटन आणि रशिया यांनी लसीकरणाला मान्यता दिली असून ब्रिटनमध्ये पुढील आठवड्यापासून लोकांना लस देण्यात येणार आहे. ही लस टोचून घेण्यासाठी भारतियांना ब्रिटनमध्ये जायचे आहे.

चर्चच्या पाद्रयाने वाग्दत्त वधूचे लैंगिक शोषण करून विवाहास नकार दिला

एरव्ही हिंदु साधू-संतांच्या विरोधात कुणी केवळ आरोपही केला, तरी हिंदु संतांची निंदानालस्ती करणारी प्रथितयश प्रसारमाध्यमे आता मात्र मूग गिळून गप्प आहेत !

पोलीस ठाणे, सीबीआय, ईडी आदी अन्वेषण यंत्रणांच्या कार्यालयामध्ये सीसीटीव्ही लावा ! – सर्वोच्च न्यायालयाचा आदेश

सर्वोच्च न्यायालयाने पोलीस ठाणे, केंद्रीय अन्वेषण विभाग (सीबीआय), अंमलबजावणी संचालनालय (ईडी), राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणा (एन्.आय.ए.) आदी अन्वेषण यंत्रणांच्या कार्यालयामध्ये सीसीटीव्ही लावण्याचा आदेश केंद्र सरकारला दिला आहे.

कोरोनाविषयीच्या नियमांचे उल्लंघन करणार्‍यांना कोविड सेंटरमध्ये काम करण्याच्या शिक्षेवर सर्वोच्च न्यायालयाची स्थगिती

एकीकडे सरकार कोरोनावर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न करते आणि दुसरीकडे त्याला प्रतिसाद न देता नियमभंग करणार्‍यांना शिक्षा करण्यालाही विरोध करते, हे हास्यास्पदच होय !

आसाम सरकार ‘लव्ह जिहाद’ रोखण्यासाठी कायदा करत आहे ! – अर्थमंत्री हिमंत बिस्वा सरमा

केंद्रातील भाजप सरकारने संपूर्ण देशासाठी लव्ह जिहादविरोधी कायदा बनवावा, असेच हिंदूंना वाटते !

देशातील प्रथम १० पोलीस ठाण्यांच्या सूचीत सांगे पोलीस ठाण्याचा समावेश

केंद्रीय गृहमंत्रालयाने वर्ष २०२० साठी सिद्ध केलेल्या देशातील प्रथम १० पोलीस ठाण्यांच्या सूचीत सांगे पोलीस ठाण्याचा समावेश आहे. राज्यातील १६ सहस्र ६७१ पोलीस ठाण्यांमधून ही निवड करण्यात आली आहे.