चर्चच्या पाद्रयाने वाग्दत्त वधूचे लैंगिक शोषण करून विवाहास नकार दिला

याविषयी ख्रिस्ती संघटना आणि निधर्मी संघटना बोलतील का ?

एरव्ही हिंदु साधू-संतांच्या विरोधात कुणी केवळ आरोपही केला, तरी हिंदु संतांची निंदानालस्ती करणारी प्रथितयश प्रसारमाध्यमे आता मात्र मूग गिळून गप्प आहेत, हे लक्षात घ्या !

कन्याकुमारी (तमिळनाडू) – येथील पाद्री बिनील याने त्याच्या वाग्दत्त वधूचे लैंगिक शोषण करून नंतर विवाहास नकार दिल्याची घटना येथे घडली. या पाद्रयाच्या  विरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. या तरुणीसाठी प्रार्थना करण्याच्या बहाण्याने पाद्रयाने तिला स्वतःच्या घरी बोलावले आणि शारीरिक संबंध प्रस्थापित केले, असा आरोप पीडित तरुणीने केला आहे.

१. पीडित तरुणीसाठी तिचे पालक योग्य वराचा शोध घेत होते. संभाव्य वर म्हणून त्यांनी पाद्री बिनील याची भेट घेतली आणि त्यांच्या मुलीचा त्याच्याशी विवाह करण्याचा निर्णय घेतला. सर्वकाही औपचारिकरित्या ठरवल्यानंतर पाद्रयाने तरुणीला विवाहाचे आश्‍वासन देऊन तिचे लैंगिक शोषण केले. जवळपास २ मास हा प्रकार चालू होता. तसेच पाद्रयाने तिच्याकडून पैसे आणि दागिनेही घेतले, असा आरोप तिने केला आहे.

२. पीडित तरुणीने तक्रारीत आरोप केला आहे की, या पाद्रयाने अनेक स्त्रियांना अशाच पद्धतीने फसवले आणि त्यांच्याकडून पैसे अन् दागिने घेतले, असे तिला नंतर लक्षात आले.