शिळे : विचार आणि अन्न !

जिभेचे चोचले असणारे ‘शिळे अन्न’ खातांना नाक मुरडतात. त्यामुळे घरातील इतरांना ते संपवावे लागते. शिळ्या अन्नाचा आणि विचारांचा काय संबंध ? असा प्रश्न पडल्याविना रहाणार नाही.

नवरी मिळेना नवर्‍याला !

सर्वच स्तरावर शेतीप्रधान भारतामध्ये शेतीचे महत्त्व सर्वांवर बिंबवायला हवे. कोरोना महामारीच्या काळात जर पाहिले, तर सर्व प्रकारचे उद्योग बंद पडले; मात्र शेती हा व्यवसाय बंद पडला नाही. त्यामुळे या व्यवसायाकडे सकारात्मक दृष्टीने पहाण्याची नितांत आवश्यकता आहे.

मातेचे धर्माचरण – युवा पिढीचे अनुकरण !

आईची शिकवण मुलांचे भवितव्य घडवते. लहान मूल हे अनुकरणप्रिय असल्याने ते आपल्या आई-वडिलांचे अनुकरण करण्यास लवकर शिकते. त्यामुळे आई-वडीलांना समाजात वावरतांना सामाजिक आणि नैतिक सतर्कता ही बाळगावीच लागते.

मातृभाषेचा सन्‍मान हवाच !

प्रत्‍येकाची भाषा आणि संस्‍कृती यांचा आपण आदर करायला शिकले पाहिजे. विदेशी आस्‍थापने या इंग्रजी भाषेवर आग्रही असतील, तर भारतासमवेत व्‍यवहार करतांना आपण त्‍यांना आपली राष्‍ट्रभाषा ‘हिंदी’ यांवर व्‍यवहार करण्‍यासाठी आग्रही असले पाहिजे.

अतिरेक टाळा !

भ्रमणभाषवर छोटे ‘रिल्स’ (काही सेकंदांचे व्हिडिओ) किंवा ‘व्लॉग’ (व्हिडिओद्वारे सांगण्यात येणारी माहिती) करण्याचे वेड पुष्कळ वाढलेले आहे. काही जण हे व्हिडिओ घरात बनवतात, तर काही जण आपापल्या कामाच्या ठिकाणी करतात किंवा काही जण मित्र-मैत्रिणींसमवेत ते सिद्ध करतात.

पावसाळ्यापूर्वीची खड्डे समस्या ?

पावसाळा चालू होण्यासाठी दीड-दोन मासांचा अवकाश असतांना रस्त्यांवरील खड्डे बुजवण्यासाठी १५ मेपर्यंत ठेकेदार नेमण्याचे आदेश नाशिक महापालिका आयुक्त
डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी बांधकाम विभागाला दिले. गेल्या पावसाळ्यातही नाशिकमधील बहुतांश रस्ते खड्डेमय बनले होते.

मानसिकता पालटायला हवी !

‘द केरल स्टोरी’ हा चित्रपट हिंदु मुलींना ‘लव्ह जिहाद’च्या जाळ्यात कसे अडकवले जात आहे ? हे दाखवणारा आणि सर्वांमध्ये विशेषतः हिंदूंमध्ये जागृती होण्यासाठी बनवण्यात आलेला चित्रपट आहे, असे म्हणावे लागेल. असे असले, तरी ‘जोपर्यंत संकट आपल्या घरापर्यंत येत नाही, तोपर्यंत त्याचे मला काय ?’

बंदीवानांना धर्मशिक्षण द्या !

निरनिराळ्या गुन्ह्यातील बंदीवानांमध्ये सुधारणा घडवून त्यांना उत्तम नागरिक म्हणून समाजात पुन्हा पाठवण्यासाठी नागपूरच्या मध्यवर्ती कारागृहाने बंदीवानांना उच्च शिक्षणाची सोय उपलब्ध करून दिली. शैक्षणिक वर्ष २०२२ मध्ये ‘इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठ, देहली’ यांच्या वतीने घेण्यात आलेल्या परीक्षेत..

‘सेवक’ वृत्ती का नाही ?

जनतेच्या करातून वेतन मिळणारे ‘कोणत्याही अपेक्षेविना जनतेची सेवा करू’, अशी शासकीय नोकरीच्या वेळी शपथ घेणारे पुढे सगळेच विसरून जातात. लोकप्रतिनिधी, प्रशासकीय अधिकारी आणि जनता सर्वच जण देशाचे सेवक आहेत.

कर्तव्यदक्षच अधिकारी हवेत !

पुण्यातील बंडगार्डन परिसरात असलेल्या राजाबहादूर मिलच्या मैदानात प्रसिद्ध संगीतकार ए.आर्. रेहमान यांच्या कार्यक्रमाचे आयोजन (कॉन्सर्ट) करण्यात आले होते. हा कार्यक्रम रात्री १० वाजल्यानंतरही चालू होता.