केंद्र सरकारची ३ कृषी कायदे केरळमध्ये लागू न करण्याचा ठराव विधानसभेत संमत
मतदानाला भाजपचा एकमेव आमदार अनुपस्थित : ठरावाला पाठिंबा
मतदानाला भाजपचा एकमेव आमदार अनुपस्थित : ठरावाला पाठिंबा
येथील धर्मांध मेहबूब शेख याने खासगी शिकवणीवर्ग घेणार्या एका तरुणीवर नोकरीचे आमिष दाखवून अत्याचार केल्याची घटना घडली असून जळगाव येथील टॉवर चौकात भारतीय जनता युवा मोर्चा, भाजप महिला आघाडीच्या वतीने शेख याच्या प्रतिमेस चप्पल मारून प्रतिमेचे दहन करण्यात आले.
केवळ भारतातच नव्हे, तर जगभरातील हिंदूंवर अत्याचार होतात, हे स्वातंत्र्यानंतर आतापर्यंतच्या राज्यकर्त्यांनी हिंदूंच्या रक्षणार्थ धोरणात्मक पावले न उचलल्याचे फलित ! या हत्यांविषयी जगातील एकही मानवाधिकार संघटना बोलत नाही, हे लक्षात घ्या !
बार्शी (जिल्हा सोलापूर) येथील सनातनच्या साधिका सौ. अलका मुकेश सुलाखे यांच्या सासूबाई श्रीमती प्रभावती सुलाखे (वय ८४ वर्षे) यांचे ३० डिसेंबरच्या रात्री अल्पशा आजाराने निधन झाले.
चीननिर्मित कोरोना लसीमध्ये डुकराचा अंश असल्याची ओरड भारतातील मुसलमान संघटनांनी केली आहे; मग ‘पाकला चीनची ही लस कशी काय चालते ?’, भारतीय मुसलमान संघटना पाकला याविषयी प्रश्न विचारतील का ?
माण तालुक्यातील श्रीराम भक्तांचे श्रद्धास्थान ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांचे श्रीक्षेत्र गोंदवले बुद्रुक येथील पुण्यतिथी महोत्सव कोरोनामुळे रहित करण्यात आला आहे.
जनतेला गुन्हेगारांपेक्षा पोलीस अधिक त्रासदायक वाटतात, हे यातून लक्षात येते ! केवळ झारखंड राज्यात अशी स्थिती आहे, तर देशातील अन्य राज्यांतही अशीच स्थिती असणारच, यात शंका नाही !
शिवशक्ती प्रतिष्ठानच्या वतीने १ जानेवारी या दिवशी रुईकर कॉलनी येथील छत्रपती संभाजी महाराजांच्या स्मारक परिसरामध्ये स्वच्छता मोहीम राबवण्यात आली.
कोरोनापासून स्वातंत्र्य मिळवायचे असेल, तर स्वयंशिस्त पाळण्याला सर्वोच्च प्राधान्य द्यावे लागेल, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जनतेला केले आहे.
३१ डिसेंबरच्या मध्यरात्री नववर्षारंभाच्या नावाखाली होणारे गैरप्रकार थांबवण्यासाठी प्रशासनाने योग्य ती पावले उचलावीत, या मागणीसाठी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने गडहिंग्लज पोलीस ठाणे आणि प्रांत कार्यालय येथे निवेदन देण्यात आले.