जगात हिंदु आणि ख्रिस्ती ३५ टक्क्यांनी, तर मुसलमान ७३ टक्क्यांनी वाढत आहेत ! – प्यू रिसर्च सेंटर

अशा वाढीमुळे भविष्यात जगावर इस्लामचे राज्य आल्यास आश्‍चर्य वाटू नये !

परभणी येथे ऑक्सिजनअभावी रुग्णाचा मृत्यू !

या प्रकरणी संबंधित वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचारी यांच्यावर मनुष्यवधाचा गुन्हा नोंद करून त्यांच्यावर बडतर्फीची कठोर कारवाई केली पाहिजे, अशी जनतेची अपेक्षा आहे.

वाघिणीच्या मृत्यूचा सुगावा देणार्‍यास २१ सहस्र रुपयांचे पारितोषिक !

घोन्सा वनपरिक्षेत्रात एका वाघिणीचा मृत्यू झाला. शिकारी मांसाच्या लोभापायी हरीण, रोही, रानडुक्कर यांना पकडण्यासाठी सापळे लावतात. ‘त्यात ही वाघीण अडकून मृत झाली असावी’, अशी शंका आहे.

यांना लगाम आवश्यकच !

हिंदूंच्या धर्मगुरूंवर खोटा आरोप करून त्यांच्यावर आक्रमण करण्याचा जाहीर कट जर देहलीत शिजत असेल, तर सरकारनेही या घटनेची गंभीर नोंद घेऊन गुन्हा होण्याच्या आत संबंधितांना तात्काळ अटक करणे अपेक्षित आहे. तरच शासनव्यवस्था अस्तित्वात आहे, असे म्हणू शकतो अन्यथा अराजक दूर नाही !

‘कंटेनमेंट झोन’मध्ये लावलेल्या बांबूंचे धुळे महापालिकेने काढले ९५ लाख रुपयांचे देयक !

शहरातील विविध ठिकाणी घोषित केलेल्या ‘कंटेनमेंट झोन’साठी ‘धनलक्ष्मी मंडप डेकोरेटर्स’ला ठेका देण्यात आला होता; मात्र यासाठी लावण्यात आलेल्या बांबूंचे देयक ९५ लाख रुपये काढण्यात आले. प्रत्येकी २८ सहस्र ६०० रुपये इतके देयक एका ‘कंटेनमेंट झोन’साठी लावण्यात आले आहे.

विदेशी ‘ऑनलाईन’ खेळांना पर्याय म्हणून भारतीय संस्कारी खेळ निर्माण करण्याचा केंद्र सरकारचा प्रयत्न !

भारतात खेळल्या जाणार्‍या ‘ऑनलाईन’ खेळांमधील ९८ टक्के खेळ विदेशीच असतात. आता यात पालट करण्याच्या सिद्धतेत केंद्र सरकार असून तसे झाले, तर दुर्गादेवी, काली माता, छत्रपती शिवाजी महाराज, झाशीच्या राणी यांच्यावर आधारित देशी खेळ मुलांना खेळण्यास मिळू शकतात.

चहा बनवून न दिल्याने रईसुद्दीनकडून पत्नी शबनम हिला तलाक

तलाकच्या विरोधात कायदा करण्यात आल्यानंतरही अशा घटना चालू आहेत. याचा अर्थ धर्मांधांना शिक्षेची भीती वाटत नाही, असेच म्हणावे लागेल ! त्यामुळे आता अधिक कठोर शिक्षा करण्यासाठी सरकारने यात पालट केला पाहिजे !

ब्रिटनमध्ये ‘ऑक्सफर्ड-एस्ट्राजेनक’ची लस घेतल्यानंतर रक्ताच्या गाठी झाल्याने ७ जणांचा मृत्यू

कोरोनावर ‘ऑक्सफर्ड-एस्ट्राजेनक’च्या लसीचे डोस ब्रिटनमध्ये दिले जात आहेत. ही लस घेतल्यानंतर रक्ताच्या गाठी झाल्याने ७ जणांना प्राण गमवावे लागले असल्याची माहिती ब्रिटनच्या मेडिसिन अँड हेल्थकेअर प्रॉडक्ट्स रेग्युलेटरी एजन्सी या वैद्यकीय प्राधिकरणाने दिली आहे.

दळणवळण बंदीच्या शक्यतेमुळे मुंबईतील रेल्वेस्थानकांवर गावाला जाणार्‍या नागरिकांच्या संख्येत वाढ !

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी २ एप्रिल या दिवशी जनतेशी साधलेल्या ‘ऑनलाईन’ संवादामध्ये ‘येत्या २ दिवसांत दळणवळण बंदीविषयी निर्णय घेण्यात येईल’, असे म्हटले होते.

पुणे जिल्हा माहिती अधिकारी आणि प्रसिद्ध व्यंगचित्रकार राजेंद्र सरग यांचे निधन

राजेंद्र सरग यांनी पुण्यासमवेत बीड, नगर, परभणी अशा अनेक ठिकाणी जिल्हा माहिती अधिकारी म्हणून काम केले होते. राज्यातील विविध दैनिके, साप्ताहिके आणि दिवाळी अंकांसाठी गेल्या अनेक वर्षांपासून ते विनामूल्य व्यंगचित्र करून देत असत.