विदेशी ‘ऑनलाईन’ खेळांना पर्याय म्हणून भारतीय संस्कारी खेळ निर्माण करण्याचा केंद्र सरकारचा प्रयत्न !

नवी देहली – भारतात खेळल्या जाणार्‍या ‘ऑनलाईन’ खेळांमधील ९८ टक्के खेळ विदेशीच असतात. आता यात पालट करण्याच्या सिद्धतेत केंद्र सरकार असून तसे झाले, तर दुर्गादेवी, काली माता, छत्रपती शिवाजी महाराज, झाशीच्या राणी यांच्यावर आधारित देशी खेळ मुलांना खेळण्यास मिळू शकतात. भारतीय मूल्यांसोबत ‘गेमिंग’चाही आनंद देतील.

‘ऑनलाईन’ खेळांमुळे विदेशी विचारांची होणारी मुलांची मानसिकता रोखणे, स्वदेशी तथा संस्कारी खेळ बनवण्यासाठी डॉ. पराग मानकीकर यांच्या नेतृत्वातील समितीने अ‍ॅनिमेशन, व्हिज्युअल इफेक्ट्स, गेमिंग आणि कॉमिक्ससाठी नॅशनल सेंटर ऑफ एक्सिलेन्स उघडण्याचा प्रस्ताव सरकारला दिला आहे. माहिती आणि प्रसारणमंत्री प्रकाश जावडेकर यांनी सांगितले की, जुलै-ऑगस्टपर्यंत या योजनेला अंतिम रूप दिले जाईल. मुंबईत सेंटर ऑफ एक्सिलेन्स स्थापन करण्याची योजना आहे.