वणी (यवतमाळ), ४ एप्रिल (वार्ता.) – येथील घोन्सा वनपरिक्षेत्रात एका वाघिणीचा मृत्यू झाला. शिकारी मांसाच्या लोभापायी हरीण, रोही, रानडुक्कर यांना पकडण्यासाठी सापळे लावतात. ‘त्यात ही वाघीण अडकून मृत झाली असावी’, अशी शंका आहे. वन विभागाने शिकार्यांचा कायम बंदोबस्त करण्यासाठी २१ सहस्र रुपयांचे पारितोषिक घोषित केले आणि कर्मचार्यांची गस्त वाढवली. (हीच गस्त आधी लावली असती, तर या चुकीसाठी सहस्रो रुपयांचा अपव्यय करायची वेळ आली नसती ! – संपादक)