जे घडत आहे, ते राज्य आणि पोलीस यांच्या प्रतिमेसाठी चांगले नाही ! – देवेंद्र फडणवीस, विरोधी पक्षनेते

उच्च न्यायालयाने केंद्रीय अन्वेषण विभागाला अन्वेषण करायला सांगितले असून यामध्ये ज्या गोष्टी पुढे येतील, त्यांचे संबंधित यंत्रणेने अन्वेषण करावे. यातून सत्य बाहेर आले पाहिजे. अन्यथा डागाळलेली प्रतिमा पुन्हा नीट होणार नाही.

बहिणीला त्रास देणार्‍याची हत्या करून मृतदेह जाळला !

६ एप्रिल या दिवशी रविवार पेठेतील खंडोबाचा माळ परिसरात एक अर्धवट जळालेल्या अवस्थेमध्ये मृतदेह आढळला. स्थानिक गुन्हे शाखेला ही माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेत अवघ्या ३ घंट्यांमध्ये या घटनेचा उलगडा केला.

नागपूर येथे संचारबंदीला व्यापार्‍यांचा विरोध

जिल्ह्यात ‘ब्रेक दि चेन’च्या अंतर्गत कोरोनाला रोखण्यासाठी कठोर निर्बंधांच्या नावावर दुकाने बंद करण्यात आली आहेत. शासनाच्या या निर्णयाला व्यापार्‍यांनी कडाडून विरोध केला आहे.

डॉ. जॉनरोस ऑस्टिन जयलाल यांच्या मुखवट्यामागील पाद्री

डॉ. जयलाल यांनी ‘कोरोना साथीमध्ये ख्रिस्ती पंथानेच जगाला तारले’, असे भासवण्याचा प्रयत्न करणे

खासगी आस्थापनातील ४५ वर्षांपुढील कर्मचारी आणि अधिकारी यांना मिळणार कामाच्या ठिकाणी लस !

आस्थापनांमध्ये लसीकरण झाल्यास महापालिका किंवा स्थानिक प्रशासनावरील ताण अल्प होईल. यासाठी आवश्यक त्या सुविधा उपलब्ध करून देण्याची सिद्धता आस्थापनांनी यापूर्वीच दर्शवली आहे.

२२ देशांमध्ये कोरोनाची तिसरी लाट

भारतामध्ये कोरोनाचे रुग्ण वाढत असतांनाच जगभरातील २२ देशांमध्ये कोरोनाची तिसरी लाट आली आहे. यांमध्ये ब्राझिल, फ्रान्स, युक्रेन आणि रशिया यांसारख्या देशांचा समावेश आहे

मुंबईत लसीअभावी ४० टक्के लसीकरण केंद्रे बंद

मुंबईमध्ये केवळ दीड दिवस पुरेल इतकाच कोरोनावरील लसीचा साठा शेष आहे. मुंबईमध्ये एकूण १२० लसीकरण केंद्रे आहेत. त्यांतील ४० लसीकरण केंद्रे लसीच्या अभावी बंद झाली आहेत.

अमरावती महापालिकेचे माजी मुख्य लेखाधिकारी प्रेमदास राठोड यांना अटक

२ कोटी ४९ लाख रुपयांचे शौचालय अपहार प्रकरण. महापालिकेचे माजी मुख्य लेखाधिकारी प्रेमदास राठोड यांना आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी २ कोटी ४९ लाख रुपयांच्या शौचालय अपहार प्रकरणी ८ एप्रिल या दिवशी अटक केली.

श्रीलंकेत इस्लामिक स्टेट, अल कायदा यांसह ११ जिहादी आतंकवादी संघटनांवर बंदी

श्रीलंका सरकारने इस्लामिक स्टेट, अल कायदा यांच्यासह अन्य ९ जिहादी आतंकवादी संघटनांंवर बंदी घातली आहे. श्रीलंकेत वर्ष २०१९ मध्ये झालेल्या जिहादी आत्मघाती आक्रमणामध्ये २७० जणांचा मृत्यू झाला होता

स्वातंत्र्योत्तर काळात कधीच न पाहिलेले संकट महाराष्ट्र गेल्या वर्षापासून पहात आहे ! – जयंत पाटील, जलसंपदामंत्री

महाराष्ट्राची लोकसंख्या, रुग्णसंख्या, किती लसी उपलब्ध झाल्या याची शहानिशा न करता परिपत्रक काढून राज्याला अपकीर्त केले जात आहे, असे ट्विट राज्याचे जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी केले आहे.