श्रीलंकेत इस्लामिक स्टेट, अल कायदा यांसह ११ जिहादी आतंकवादी संघटनांवर बंदी

वर्ष २०१९ मधील जिहादी आक्रमण

कोलंबो (श्रीलंका) – श्रीलंका सरकारने इस्लामिक स्टेट, अल कायदा यांच्यासह अन्य ९ जिहादी आतंकवादी संघटनांंवर बंदी घातली आहे. श्रीलंकेत वर्ष २०१९ मध्ये झालेल्या जिहादी आत्मघाती आक्रमणामध्ये २७० जणांचा मृत्यू झाला होता.

यात इस्लामिक स्टेटशी संबंधित ‘नॅशनॅलिस्ट तौहीद जमात’ या जिहाद आतंकवादी संघटनेचा सहभाग होता. त्यानंतर श्रीलंकेचे राष्ट्रपती मैत्रीपाल सिरिसेना यांनी एक समिती गठीत करून या संघटनेवर बंदी घालण्यासाठी शिफारस केली होती.