सांगली – स्वातंत्र्योत्तर काळात कधीच न पाहिलेले संकट महाराष्ट्र गेल्या वर्षापासून पहात आहे. केंद्र सरकारचे पहिल्यापासून मर्यादित सहकार्य असतांना महाराष्ट्राचे आरोग्य खाते, आरोग्यमंत्री राजेश टोपे आणि इतर प्रशासन या संकटाला तोंड देत आहेत.
स्वातंत्र्योत्तर काळात कधीच न पाहिलेले संकट महाराष्ट्र मागील वर्षापासून पाहत आहे. महाराष्ट्राचे आरोग्य खाते,आरोग्यमंत्री राजेश टोपे व इतर संपूर्ण प्रशासन पूर्ण ताकदीने केंद्र सरकारचे पहिल्यापासून मर्यादित सहकार्य असताना या संकटाचा मुकाबला करत आहेत. @rajeshtope11
— Jayant Patil (@Jayant_R_Patil) April 8, 2021
कदाचित केंद्रीय आरोग्यमंत्र्यांना महाराष्ट्राची पूर्ण माहिती नाही किंवा त्यांना अपूर्ण माहिती दिली गेली. महाराष्ट्राची लोकसंख्या, रुग्ण संख्या, किती लसी उपलब्ध झाल्या या प्रश्नांची शहानिशा करण्याआधी परिपत्रक काढून राज्याला बदनाम करण्याचे प्रयत्न केले जात आहेत का अशी मनात शंका आहे
— Jayant Patil (@Jayant_R_Patil) April 8, 2021
केंद्रीय आरोग्य मंत्र्यांनी प्रसारित केलेल्या वक्तव्यातून केवळ महाराष्ट्रविषयीचा द्वेष प्रतीत होत आहे. महाराष्ट्राची लोकसंख्या, रुग्णसंख्या, किती लसी उपलब्ध झाल्या याची शहानिशा न करता परिपत्रक काढून राज्याला अपकीर्त केले जात आहे, असे ट्विट राज्याचे जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी केले आहे.