मालेगाव येथे धर्मांधाकडे गर्भपाताच्या औषधांचा अनधिकृत साठा जप्त !

पोलिसांनी या प्रकरणी आबिद आमिन या संशयित आरोपीस अटक करून आझादनगर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद केला आहे.

नवी मुंबईत चाचणी न केलेल्या व्यक्तींचे कोरोना अहवाल दिले !

कहर म्हणजे काही वर्षांपूर्वी मृत झालेल्या व्यक्तीचाही कोरोनाचा पडताळणी अहवाल देण्याचा प्रकार घडला आहे. या प्रकरणी विधान परिषदेचे विरोधीपक्ष नेते प्रवीण दरेकर यांनी आयुक्तांची भेट घेऊन दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

समुद्राचे पाणी गोडे करण्याच्या महाग प्रकल्पाचा फेरविचार करावा – आशिष शेलार

निःक्षारीकरणाच्या प्रकल्प उभारण्याचा आढावा घेऊन पुढील प्रक्रिया चालू करण्याचे आदेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले आहेत; मात्र हा प्रकल्प खर्चिक आहे, असे भाजपाने म्हटले आहे.

शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांच्या निकटवर्तियाला अटक

ईडीने मंगळवारी सरनाईक यांच्या घरी आणि त्यांच्याशी संबंधित कार्यालये अशा १० ठिकाणी धाडी टाकल्या.

कार्तिक पौर्णिमेला श्री जोतिबा देवाचे दर्शन मर्यादित भाविकांनाच !

२९ आणि ३० नोव्हेंबर या २ दिवसांत भाविकांनी गर्दी टाळावी, असे आवाहन जिल्हाधिकारी यांनी केले आहे.

नाशिक महानगरपालिकेच्या विरुद्ध महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे तक्रार

पालिका प्रशासनाच्या लक्षात का आले नाही ? गणेशमूर्ती विसर्जनाच्या वेळी कांगावा करणारे तथाकथित पर्यावरणवादी आणि अंनिसवाले  आता कुठे आहेत ?

वणीत कापसाची आवक घटली

बोंडअळी, बोंडसड यामुळे कापसाच्या उत्पन्नात पुष्कळ घट झाली आणि त्यामुळे कापसाची आवक घटल्याचे बोलले जात आहे. कापसाच्या उत्पन्नात होत असलेली घट शेतकर्‍यांची चिंता वाढवत आहे.

मध्यवर्ती असणारे प्रतापसिंह उद्यान बंद करू नका ! – प्रतापसिंह उद्यान बचाओ समितीचे आयुक्तांना निवेदन

प्रतापसिंह उद्यानाचा भाडे लिलावाच्या माध्यमातून होणारा बाजार हाणून पाडू ! – सौ. स्वाती शिंदे, नगरसेविका, भाजप

सिन्नर (नाशिक) येथील सहकारी संस्थेसह एका खासगी आस्थापनाच्या आर्थिक व्यवहारांची अंमलबजावणी संचालनालयाकडून चौकशी

ईडीच्या या कारवाईच्या वृत्ताला शहर आणि ग्रामीण पोलिसांनी दुजोरा दिला आहे.

वेळेत अग्नीशमनाचा बंब न मिळाल्याने ७ एकरवरील उसाची हानी

बंब उपलब्ध न झाल्याने शेतकर्‍यांचा ऊस जळाले याची भरपाई कोण देणार ? उद्या एखादे घर-दुकाने यांना आग लागल्यावर बंब नसल्याने जीवितहानी झाल्यास त्याचे दायित्व कुणाचे ?