बांदा तपासणी नाक्यावर पावणे चार लाख रुपयांचे अवैध मद्य पोलिसांच्या कह्यात

गोव्याहून नियमितपणे महाराष्ट्रात मद्याची अवैध वाहतूक होत असते ! पोलीस त्या वेळी थातुर-मातुर कारवाई करतात आणि सोडून देतात. त्यामुळे वर्षानुवर्षे कारवाई करूनही वाहतूक थांबत नाही ! त्यामुळे अशा कारवाया ‘तू मारल्यासारखे कर, मी रडल्यासारखे करतो’, अशा प्रकारच्या आहेत का, अशी शंका येते !

कर्नाटकच्या माजी मंत्र्यांचे अपहरण आणि सुटका  

माजी मंत्री वार्थुर प्रकाश यांचे अपहरण केले होते मात्र दुसर्‍या दिवशी त्यांची सुटका केली. या अपहरणामागील नेमके कारण समजू शकलेले नाही.

कोकण रेल्वेमार्गावर ४ डिसेंबरपासून २ अतीजलद गाड्या धावणार

गाडीचे आरक्षण ९ डिसेंबरपासून चालू होणार आहे. जबलपूर-कोईम्बतूर स्पेशल गाडी ५ ते २६ डिसेंबरपर्यंत या कालावधीत धावणार आहे.

गोव्यात गायींची आयात टप्प्याटप्याने बंद करणार ! – डॉ. प्रमोद सावंत, मुख्यमंत्री

राज्यातील शेतकर्‍यांच्या उत्पन्नवाढीवरून मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या अध्यक्षतेखाली ‘इंडियन कौन्सिल फॉर अ‍ॅग्रिकल्चर रिसर्च’ (इकार) या संस्थेच्या पदाधिकार्‍यांसमवेत एक बैठक झाली. या बैठकीनंतर मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी ही माहिती दिली.

सिंधुदुर्गातील सर्व सत्तास्थानांवर भगवा फडकवा ! – अरुण दूधवडकर, जिल्हा संपर्कप्रमुख, शिवसेना

कणकवली तालुका शिवसेनेच्या माध्यमातून येथील मातोश्री मंगल कार्यालयात दूधवडकर यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार घालून या अभियानाचा प्रारंभ करण्यात आला. या वेळी जिल्हाप्रमुख संजय पडते यांच्यासह विविध पदाधिकारी उपस्थित होते.

चीनचे चंद्रयान चंद्रावर यशस्वीरित्या उतरले !

चीनची विस्तारवादी महत्त्वाकांक्षा पहाता उद्या चंद्रावर त्याचा अधिकार असल्याचा दावा चीनने केल्यास आश्‍चर्य वाटू नये !

गोव्यात दिवसभरात ३ कोरोनाबाधितांचा मृत्यू

गोव्यात दिवसभरात ३ कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे, तर दिवसभरात केलेल्या २ सहस्र ३ चाचण्यांमध्ये ११७ कोरोनाबाधित आढळले आहेत.

पडवणे डोंगरावर भीषण आग

तालुक्यातील पडवणे डोंगरावर सहस्रो एकर परिसर आगीत बेचिराख झाला. या डोंगरावर आंब्याच्या बागा असल्याने मोठी हानी झाली असण्याची शक्यता आहे, तसेच शेतमांगरही जळून गेले आहेत. या घटनेची भाजपचे आमदार नीतेश राणे यांनी पहाणी केली.

वीज खात्यातील ३२ ‘डाटा एन्ट्री ऑपरेटर्स’ची नियुक्ती न्यायालयाकडून रहित

मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपिठाने वीज खात्यातील ३२ ‘डाटा एन्ट्री ऑपरेटर्स’ची नियुक्ती रहित केली आहे. अंतिम उमेदवारी सूची सिद्ध करतांना नियमांचे उल्लंघन केल्याचा ठपका न्यायालयाने ठेवला आहे. ३२ ‘डाटा एन्ट्री ऑपरेटर्स’ची ही नियुक्ती वर्ष २०१६ मध्ये करण्यात आली होती.