आसाममधील ‘एआययूडीएफ’च्या ‘अजमल फाऊंडेशन’ला विदेशी जिहादी संघटनांकडून मिळाल्या कोट्यवधी रुपयांच्या देणग्या ! – ‘लीगल राइट्स ऑब्जर्वेटरी’चा दावा

‘लीगल राइट्स ऑब्जर्वेटरी’ या संस्थेला अशी माहिती मिळते, ती सर्व यंत्रणा हाताशी असणार्‍या केंद्र सरकारला का मिळत नाही ? असा प्रश्‍न उपस्थित होतो !

हे शेतकर्‍यांचे आंदोलन नसून धनदांडग्या दलालांचे आंदोलन ! – नितीन फळदेसाई, प्रदेशाध्यक्ष, गोवा सुरक्षा मंच

शेतकर्‍यांच्या नावाखाली पुकारण्यात आलेल्या ‘भारत बंद’ला गोवा सुरक्षा मंचचा विरोध

मोरजीतील काँग्रेस उमेदवाराचा मगोच्या उमेदवाराला पाठिंबा

राज्यात १२ डिसेंबरला होणार्‍या जिल्हा पंचायत निवडणुकीत मोरजीतील काँग्रेसचे उमेदवार महेश कोंडारकर यांनी मगोपचे उमेदवार श्रीधर मांजरेकर यांना पाठिंबा घोषित केला आहे.

बंदुकीची गोळी लागून युवकाचा मृत्यू झाल्याप्रकरणी चौघांना पोलीस कोठडी

युवराज दीपक वारंग (वय १८ वर्षे) या युवकाचा २६ नोव्हेंबरला छातीत बंदुकीची गोळी (छरा) घुसून मृत्यू झाला होता. या प्रकरणी कुडाळ पोलिसांनी ४  संशयितांना अटक केली अन् त्यांच्याकडून २ बंदूका कह्यात घेतल्या.

तम्नार वीज प्रकल्पाला मोले ग्रामपंचायतीने दिलेली बांधकाम अनुज्ञप्ती न्यायालयाकडून रहित

सांगोड येथे उभारण्यात येणार्‍या तम्नार वीजप्रकल्पाला मोले पंचायतीने दिलेली बांधकाम अनुज्ञप्ती उच्च न्यायालयाने रहित केली आहे.

भाजपच्या प्रदेश कार्यकारिणीच्या बैठकीत गोहत्याबंदी आणि लव्ह जिहादविरोधी विधेयक यांची मागणी !

गोहत्या बंदी विधेयक आणि लव्ह जिहादविरोधी विधेयक लवकरात लवकरात विधीमंडळात मांडावे, अशी मागणी भाजपच्या प्रदेश कार्यकारिणीत ६ डिसेंबर या दिवशी करण्यात आली.

धर्मादाय कार्यालयातील सुनावणी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून ! – आयुक्त

कोरोनामुळे धर्मादाय आयुक्तालयातील अनिर्णित प्रकरणांच्या संख्येत वाढ झाली आहे. परिणामी राज्यातील धर्मादाय कार्यालयांमध्ये व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे कामकाज चालू करण्याविषयी धर्मादाय आयुक्तांनी परिपत्रक काढले आहे.

शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देणार्‍या सहा आंदोलकांवर गुन्हा नोंद

कृषी आणि कामगार कायदे मागे घेण्यासाठी देहलीमध्ये चालू असलेल्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी येथील छत्रपती संभाजी चौकात आंदोलन करण्यात आले. आंदोलकांनी सरकारच्या प्रतिकात्मक पुतळ्याचेही दहन केले. आंदोलकांच्या विरोधात शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला .

(म्हणे) ‘आंदोलनामध्ये बळाचा वापर करून ती दडपणे चुकीचे !’

देहलीत चालू असलेले शेतकर्‍यांचे आंदोलन सरकारने कुठेही दडपलेले नाही, उलट त्यांच्याशी आतापर्यंत ५ फेर्‍यांची चर्चा झालेली आहे. तरीही भारताची अपकीर्ती करण्यासाठी आणि दबाव निर्माण करण्यासाठी अशा प्रकारची विधाने संयुक्त राष्ट्रे आणि अन्य पाश्‍चात्त्य देश जाणीवपूर्वक करत आहेत, त्यांना समज देण्याची आवश्यकता आहे !