राष्ट्रहिताला प्राधान्य देत सर्बियाकडून रशियासमवेत नैसर्गिक वायूसंबंधी नवा करार !

सर्बियाचे राष्ट्राध्यक्ष ॲलेक्झँडर व्युसिक यांनी रशियासमवेत ३ वर्षांचा नैसर्गिक वायूसंबंधी करार केल्याचे घोषित केले आहे. त्यांची रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांच्याशी नुकतीच चर्चा झाली. दोन्ही नेत्यांमध्ये वायू कराराखेरीज अन्यही विषयांवर व्यापारासंबंधी विचार करण्यात आल्याचे व्युसिक यांनी सांगितले.

फ्रान्समध्ये तरणतलावात मुसलमान महिलांना ‘बुर्किनी’ घालून पोहण्याला अनुमती नाही ! – न्यायालयाचा निर्णय

फ्रान्सच्या एका न्यायालयाने यापूर्वी मुसलमान महिलांना समुद्र आणि सार्वजनिक तरणतलाव (स्विमिंग पूल) येथे बुर्किनी घालून पोहण्याची दिलेली अनुमती रहित केली आहे. फ्रान्सचे गृहमंत्री गेराल्ड डारमॅनिन यांनी याची माहिती दिलीे.

शेजारी देश समृद्ध व्हावेत, अशी चीनची इच्छा !

चीनने शेकडो कोटी रुपयांचे कर्ज देऊन श्रीलंकेचा घात केला. त्यामुळेच त्याचे आर्थिक कंबरडे मोडले. नेपाळ आणि पाकिस्तान ही त्याच मार्गाने जात असतांना अशी अविचारी अन् अपरिपक्व विधाने गांधी आणि त्यांच्या काँग्रेसला इतिहासजमा करण्यासाठी पुरेशी आहेत !

काश्मीरला भारतापासून तोडण्याची भूमिका मांडणारे ब्रिटीश राजकारणी जेरेमी कॉर्बिन यांची राहुल गांधी यांनी घेतली भेट !

राहुल गांधी आणि त्यांच्या काँग्रेस पक्षावर याआधीही पाकिस्तानची भूमिका पुढे रेटण्याचे आरोप झालेले आहेत. त्यामुळे असे नेते अन् त्यांचे पक्ष यांची राजकीय कारकीर्द संपवण्यासाठी भारतीय जनता आतूर आहे, हे त्यांनी लक्षात ठेवावे !

युक्रेनकडून पहिल्या युद्धगुन्हेगार रशियन सैनिकास जन्मठेप !

२१ वर्षीय वादिम शिशिमरिन् असे या रशियन सैनिकाचे नाव असून तो रणगाडा कमांडर आहे. त्याला ६२ वर्षीय ओलेक्सांद्र शेलिपोव्ह यांच्या मृत्यूप्रकरणी दोषी ठरवण्यात आले.

कोरोना महामारी अद्याप पूर्णपणे संपलेली नाही ! – जागतिक आरोग्य संघटना

गेब्रेयसस पुढे म्हणाले, ‘‘जगातील ७० देशांमध्ये पुन्हा एकदा करोना रुग्णांची संख्या वाढू लागली आहे. सध्या सर्वत्रच चाचण्यांची संख्या अल्प झाल्याचे दिसून येत आहे. त्यामुळेच सर्वांत अल्प लसीकरण झालेल्या आफ्रिका खंडात कोरोना मृतांची संख्या वाढत आहे.

(म्हणे) ‘भाजप देशात ध्रुवीकरणाचे रॉकेल शिंपडत असून ठिणगी टाकल्यावर देश जळायला लागेल !’ – राहुल गांधी

राहुल गांधी यांचे पणजोबा नेहरू पंतप्रधान असतांना चीनने भारताची सहस्रो चौरस कि.मी. भूमी गिळंकृत केली आणि काँग्रेसने कधीही ती चीनकडून परत मिळवली नाही, याविषयी राहुल गांधी का बोलत नाहीत ?

युक्रेनला ‘नाटो’ सैनिकी साहाय्य पुरवणार !

युक्रेनी सैन्य रशियाशी शौर्याने लढत असल्याने ते युद्ध जिंकू शकते, असा विश्वास ‘नाटो’चे प्रमुख जेन्स स्टोल्टेनबर्ग यांनी व्यक्त केला.

गव्हाच्या जागतिक बाजारमूल्याने गाठला विक्रमी उच्चांक !

एकूणच जागतिक स्तरावर महागाई वाढल्याने गरीब देशांत दुष्काळ आणि सामाजिक असंतोष पहावयास मिळू शकतो, असे सांगण्यात येत आहे.

तमिळनाडूतील देवसहायम् पिल्लई यांना व्हॅटिकनकडून ‘संत’ घोषित

पिल्लई हे पहिले भारतीय सामान्य व्यक्ती आहेत, ज्यांना संत घोषित करण्यात आले आहे. या वेळी भारतियांच्या समुदायाने तिरंगा ध्वज फडकावत आनंदोत्सव साजरा केला.