लंडन (इंग्लंड) – ब्रिटन येथील ‘लेबर पार्टी’चे माजी खासदार आणि कट्टर भारत अन् हिंदु द्वेष्टे जेरेमी कॉर्बिन यांची काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी भेट घेतली. यामुळे गांधी यांना मोठ्या प्रमाणात विरोध होत आहे. भाजपचे नेते कपिल मिश्रा यांनी गांधी यांच्या भेटीचा निषेध करत ‘काश्मीरला भारतापासून विलग करण्याची भूमिका उघडपणे मांडणाऱ्या कॉर्बिन यांना राहुल गांधी का भेटले ?’, असा प्रश्न उपस्थित करणारे ट्वीट केले आहे.
Rahul Gandhi meets Jeremy Corbyn in London, the anti-India, anti-semitic, terror sympathising former leader of the British Labour party https://t.co/w865652Wmv
— OpIndia.com (@OpIndia_com) May 24, 2022
मोदी मिले 2015 में जब जेरेमी विपक्ष का नेता था, मिलना प्रोटोकॉल था
जेरेमी का IRA से कनेक्शन 2017 में सामने आया
2019 में जेरेमी ने कश्मीर को भारत से अलग करने की मांग की
राहुल गांधी इस बाद मिलने गया, क्यों ?
पर जिसे भारत एक देश ही नहीं लगता उसके चमचें समझ भी क्या सकते हैं https://t.co/dgXzVGdFDv
— Kapil Mishra (@KapilMishra_IND) May 24, 2022
‘लेबर पार्टी’ने नेहमीच कॉर्बिन यांच्या काश्मीरसंदर्भातील भूमिकेपासून स्वत:ला दूर ठेवले आहे. भाजपचे नेते आणि वैज्ञानिक विजय चौथाईवाले यांनीही गांधी यांच्या भेटीचा निषेध केला आहे.
संपादकीय भूमिकाराहुल गांधी आणि त्यांच्या काँग्रेस पक्षावर याआधीही पाकिस्तानची भूमिका पुढे रेटण्याचे आरोप झालेले आहेत. त्यामुळे असे नेते अन् त्यांचे पक्ष यांची राजकीय कारकीर्द संपवण्यासाठी भारतीय जनता आतूर आहे, हे त्यांनी लक्षात ठेवावे ! |